Friday, December 3, 2021

नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षाला केली मारहाण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. भंडारदरा भरल्यावर राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांनी परस्पर जलपूजन कार्यक्रम उरकला होता. त्यामुळे पक्षातील दुफळी समोर आली आहे.

ही दुफळी दिवसेंदिवस वाढत आहे. नेत्यांप्रमाणेच कार्यकर्त्यांतही बे बनाव वाढत आहे.विकासकामावर भ्रष्टाचार झाल्याची टीका होत होती. या संदर्भात आमदारांना चुकीची माहिती दिल्याचे कारण सांगत अकोले तालुक्यातील राष्ट्रवादी सोशल मीडियाची तालुका अध्यक्षांना विठा, ठाकरवाडीतील तरुणांनी बस स्थानकावर काल मारहाण केली.

 

विठा गावात दहा लाख रुपयांचा दशक्रियाविधी घाट बांधण्यात आला आहे. मात्र त्याचा दर्जा पाहता तो केवळ एकूण रकमेच्या वीस टक्के इतकाच किमतीचा झाला, असल्याचा आरोप नागरिकांतून होत होता. याबाबत ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधींना कळविले. यात काही राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांची नावे लोकप्रतिनिधींना सांगण्यात आली होती.

लोकप्रतिनिधींनी नाव समोर आलेल्या कार्यकर्त्यांना या संदर्भात विचारणा केली. कार्यकर्त्यांनी हे सर्व खोटे असल्याचे सांगितले. व ही माहिती कोणी दिली याची विचारणा लोकप्रतिनिधींना केली. यावर लोकप्रतिनिधींनी माहिती देणाऱ्यांची नावे सांगितली.

तोच धागा पकडत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे मीडिया सेल अध्यक्षाला एस.टी. बस मधून खाली उतरवत मारहाण केली. गेली अडीच वर्षे लोकप्रतिनिधींना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या कार्यकर्त्याला मारहाण झाली. त्यामुळे अकोले तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकर्त्याला पाठबळ मिळत नसल्याची चर्चा विठा गावात सुरू झाली आहे.

तालुक्यातील सोशल मीडियाच्या अध्यक्षांना चोप दिल्याने तालुक्यात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विठा ग्रामस्थांनी बैठक घेऊन हा वाद पोलिस ठाण्यात जाण्यापूर्वीच मिटविला मात्र तालुक्यातील गावागावात या घटनेची जोरदार चर्चा आहे. विठामधील दशक्रिया विधीचा घाट, पिचड यांच्या काळातील राष्ट्रवादी व आताची राष्ट्रवादीची स्थिती यावर तालुक्यात राजकीय चर्चा रंगली आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!