Friday, December 3, 2021

नगर जिल्ह्यात जाळली भाजप नेत्याची लाखोंची वाहने

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहर पोलिस ठाण्याजवळील नगरपालिका क्रीडा संकुल परिसरातील अभंग मळा या दाट लोकवस्तीत राहणारे भाजपाच्या ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष संपतराव गलांडे यांच्या राहत्या घरासमोर उभ्या केलेल्या दोन दुचाकींसह एका चारचाकी वाहनाला,

पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने आग लावली. या घटनेत तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत जागरूक नागरिकांमुळे आग आटोक्यात आल्याने जीवित वा वित्त हानी झाली नाही.

भाजपाच्या ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष संपतराव गलांडे यांचे अभंग मळा परिसरातील दाट लोकवस्तीत निवासस्थान आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची पडताळणी करुन हाती काही धागेदोरे लागतात का याची तपासणी केली असता

; घराबाहेर उभी केलेली चारचाकी (MH-17-AZ-6093) तसेच (MH-42-AC-9264) व केटीएम (MH-17-CK-3163) या दोन महागड्या दुचाकींवर अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणास्तव तीव्र ज्वालाग्रही द्रवपदार्थ शिंपडून जाणीवपूर्वक आग लावल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. आग लागल्याचे समजताच

 परिसरातील नागरिकांनी गलांडे कुटूंबियांना जागे करुन घटनेची माहिती दिली. स्थानिकांसह नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. या घटनेत गलांडे यांचे सुमारे 11 लाखांचे नुकसान झाले असून, हा घातपाताचा प्रकार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.या प्रकरणी

संपत रामचंद्र गलांडे ( वय 45 ), रा. अभंग मळा यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पंकज शिंदे पुढील तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!