Wednesday, December 8, 2021

नगर जिल्ह्यातील संतापजनक घटना:मुल होत नाही म्हणून पत्नीला मित्रासोबत संबंध ठेवण्याची बळजबरी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात काही ठिकाणी महिलांवरील अत्याचाराच्या घटना उघडकीस येत असताना अहमनगरच्या पाथर्डी तालुक्यात पतीने मित्राच्या मदतीने आपल्या पत्नीवर अत्याचार घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मूल होत नाही, म्हणून पत्नीला जबदस्तीने आपल्या मित्रासोबत संबंध ठेवण्यास

भाग पाडणाऱ्या पती आणि त्याच्या मित्रालाही पोलिसांनी अटक केली. पीडित महिलेने शेजारी राहणाऱ्या महिलेच्या मदतीने आपल्या नातेवाईकांशी संपर्क केला आणि पोलिसांत जाऊन फिर्याद दिल्याने हा प्रकार उघडकीस आला.

कल्याणच्या एका २२ वर्षीय तरुणीचे पाथर्डी तालुक्यातील एका गावातील तरुणाशी २०२० मध्ये लग्न झाले आहे. काही काळ पतीच्या कुटुंबियांसह ती सासरी राहिली. त्यानंतर भांडण झाल्याने मुलगी माहेरी निघून गेली होती. मागील महिन्यात मुलगी सासरच्या गावातच राहणाऱ्या तिच्या आजोबांकडे राहण्यासाठी आली.

सुमारे पंधरा दिवसांपूर्वी तिचा पती तिच्या आजोबांच्या घरी आला. झाले गेले विसरून जाऊन पुन्हा नांदायला चल असे म्हणून तिला सोबत घेऊन गेला. नवऱ्याने केलेली विनंती पाहून मुलगीही नांदायला तयार झाली.

सासरी राहत असताना २२ सप्टेंबरच्या रात्री तिचा पती त्याच्या एका मित्रासह घरी आला. घरात दोघांनी तिच्या खोलीत जाऊन दरवाजा आतून बंद केला. आपल्याला मूल हवे असल्याने तू या मित्राशी संबंध ठेव, असे पतीने पत्नीला सांगितले. यासाठी तिने नकार दिला. तेव्हा पतीने तिला पकडून तिच्या तोंडात जबरदस्तीने दोन गोळ्या टाकल्या. त्यामुळे तिला

काही वेळातच चक्कर आली. त्यानंतर पतीच्या मित्राने तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर पतीनेही अत्याचार केले. नंतर मित्र निघून गेला. पतीने तिला धमकावले की ही गोष्ट कोणाला सांगू नको. मूल हवे असेल तर मित्राशी संबंध ठेवावेच लागतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा तो मित्र घरी आला. त्या दोघांनीही पुन्हा तिच्यावर अत्याचार केले.

दुसऱ्या दिवशी दुपारी पती घरी नसताना त्या तरुणीने शेजारी राहणाऱ्या महिलेकडे जाऊन तिच्या मोबाईलवरून माहेरी संपर्क केला. त्यानुसार तिचा मामा तिच्याकडे आले. दोघांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला पती आणि त्याच्या मित्राला अटक करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!