Wednesday, December 8, 2021

नगर जिल्ह्यावर लॉकडाऊनचं संकट ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा सर्वात जास्त फटका पारनेर, पाथर्डी व संगमनेर तालुक्याला बसला होता. मागील आठवड्यापासून संगमनेर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. काल (ता. 25) संगमनेर तालुक्यात 188 रुग्ण आढळून आले.

संगमनेर तालुका वगळता जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात 80 अथवा त्यापेक्षा जास्त रुग्ण दिवसाला आढळत नाहीत.संगमनेर तालुक्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील 27 ठिकाणे यात काही पूर्ण व काही

अंशतः प्रतिबंधित करण्यात आले आहेत. तर संगमनेर शहरातील 4 ठिकाणेही प्रतिबंधित करण्यात आली आहेत. 10 दिवसांसाठी ही क्षेत्रे प्रतिबंधित असणार आहेत. अहमदनगर शहरात शुक्रवारी (ता. 24) 15 रुग्ण आढळून आले होते तर काल (ता. 25) 31 रुग्ण आढळून आले होते. म्हणजे अहमदनगर शहरातही कोरोना वेगात वाढत आहेत.

पारनेर तालुक्यातील बरेच नागरिक नोकरी निमित्त पुणे, ठाणे व मुंबईत आहेत. तर संगमनेर तालुका हा पुणे, ठाणे, मुंबई परिसराला नाशिक व गुजरातशी जोडणारे महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे जिल्ह्यातून होणाऱ्या कोरोना रुग्णांची ये-जा वर नियंत्रण ठेवण्या

बरोबरच जिल्ह्यात वाढलेली कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आणण्याचे आव्हाऩ जिल्हा प्रशासना समोर आहे.विभागीय आयुक्तांनी अहमदनगरमध्ये घेतलेल्या बैठकीत कोरोना रुग्ण संख्या वाढतच राहिल्यास लॉकडाऊन करण्याचा इशाराही दिला होता. त्यामुळे आता जिल्ह्यात लॉकडाऊनची टांगती तलवार आहे.

लॉकडाऊन झाल्यास आर्थिक चक्रावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यातच राज्यातील धार्मिक स्थळे, चित्रपटगृहे खुली होत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनासमोरील आव्हान अधिक कठीण झाले आहे.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!