माय महाराष्ट्र न्यूज:बारनच्या शहााबाद येथील आहे. येथे एक नववधू आपल्या नवऱ्याला आणि त्याच्या घरच्यांना चकमा देऊन आपल्या प्रियकरासोबत पळून गेली. एवढंच काय तर नववधू रोख
रक्कम आणि दागिने चोरुन पळाली.पोलिसांनी रोख रक्कम आणि दागिने चोरल्याप्रकरणी प्रियकरासह पळून गेलेल्या नववधूला आणि तिच्या बॉयफ्रेंडला अटक केली आहे. त्यांच्याकडून रोख
रक्कम आणि दागिनेही पोलिसांनी जप्त केले आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेने प्रियकरासह मिळून तिच्या सासरच्या लोकांच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळल्या, त्यानंतर घरातील
मौल्यवान ऐवज घेऊन पळ काढला. आरोपींना अटक केल्यानंतर पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.2 मार्च रोजी पीडित पुरणचंद किराड यांनी शहााबाद पोलिस ठाण्यात लेखी तक्रार नोंदवली होती.
ज्यामध्ये सांगितले की, त्यांची सून उर्मिला, मुकेश गुर्जर आणि दिलीप यांच्यासोबत पळून गेली, शिवाय तिने घरातील दागिने चोरले.या दागिन्यांमध्ये मंगळसूत्र, चांदीचे 3 जोडे पायघोळ, सोन्याचा हार, सोन्याच्या बांगड्या,
सोन्याचे कानातले, दोन सोन्याच्या अंगठ्या आणि 50 हजार रुपये चोरीला गेले होते. त्यानंतर पोलिसांनी या आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर आरोपी पकडले देखील गेले. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.