Tuesday, November 30, 2021

नगर जिल्ह्यातील या तालुक्याला अतिवृष्टीचा पुन्हा तडाखा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी शेवगाव, पाथर्डी या दोन तालुक्याला अतिवृष्टीचा मोठा तडका बसला होता.आता पुन्हा तडका बसला आहे.शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरात रविवारी (ता.२६) पहाटे एकच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला.

पूर्व भागातील गावांत लागोपाठ तिसऱ्यांदा अतिवृष्टी झाल्याने शेतांना तलावांचे स्वरूप आले. शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेवगाव-गेवराई मार्गावरील काळ्या ओढ्यावरील पूल पुरामूळे उखडल्याने वाहतूक ठप्प झाली होती.बोधेगावसह बालमटाकळी, लाडजळगाव, गोळेगाव, शेकटे, आधोडी,

आंतरवाली, दिवटे, हातगाव, कांबी, मुंगी व इतर गावांत यापूर्वी ३० ऑगस्ट, ४ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आलेले आहेत. त्यात तिसऱ्यांदा पुन्हा रविवारी पहाटे जोरदार पाऊस झाला. या पावसाची बोधेगाव व चापडगाव मंडलात ७६ व ६७ मिलिमीटर अशी नोंद झाली. एकाच महिन्यात

तीनदा अतिवृष्टीचा तडाखा बसल्याने कपाशी, तूर, सोयाबीन, बाजरी, कांदा, ऊस आदी खरिप पिकांचे मातेरे झाले. अजूनही मंडलातील अनेक शेतकऱ्यांच्या नुकसानींचे पंचनामे झालेले नाहीत. दरम्यान, मागील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झालेले आहेत. मात्र अद्यापपर्यंत नुकसानभरपाई मिळालेली नाही.

त्यातच पुन्हा एकदा या परिसराला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. त्यामुळे या दोन्ही नुकसानीची भरपाई घोषणा न करता तातडीने शेतकऱ्यांच्या हातात देण्याची मागणी होत आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!