Tuesday, November 30, 2021

पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांचं पाणी मराठवाड्यात आणण्याचा प्रयत्न

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मराठवाड्यात पाणी टंचाई हा अतिशय गंभीर प्रश्न होऊन बसलेला आहे. उन्हाळ्यामध्ये तर मराठवाड्यातील जिल्ह्यांची स्थिती अत्यंत दयनीय अशी होते. यावर काहीतरी ठोस उपाय हवा अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जाते.

याच समस्येवर बोलताना पश्चिम महाराष्ट्र तसेच नाशिक येथील नद्यांचे पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली. ते औरंगाबादमध्ये पत्रकार परिषेद बोलत होते.

जायकवाडी धरण तसेच धरणाची पाणी साठवण्याची क्षमता यावर भाष्य केलं. “जायकवाडी धरणाच्या दोन्ही कालव्यांची वहन क्षमता वाढवणार आहोत. जायकवाडी धरणातील गाळ काढला तर पाणी साठवण्याची क्षमता वाढेल,” असे जयंत पाटील म्हणाले.

तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिकमधील नद्यांचे पाणी मराठवाड्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगामी काळात गोदावरी नदीवर 782 नवे बंधारे उभारण्यात येणार आहेत, अशा शब्दांत त्यांनी सरकारच्या आगामी योजनेबद्दलही सांगितले.

पाटील यांनी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्याकडे निधीसाठी विनंती केली. “भागवत कराड यांना विनंती आहे की, नदीजोड प्रकल्पासाठी केंद्रातून निधी आणावा. ते सध्या केंद्रात आहेत,” असे जयंत पाटील कराड यांना उद्देशून म्हणाले. जलसंपदा विभागातील भरती प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न विचारले जातात.

यावर बोलताना जलसंपदा विभागाच्या भरतीबाबत वित्तविभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे. जलसंपदा विभागाला लागणारे मनुष्यबळ अधिकाऱ्यांना लागेल तसे उपलब्ध करून घ्यावे, असे जयंत पाटील म्हणाले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!