Tuesday, November 30, 2021

ज्यांना 15 हजार रुपये पगार आहे का ? तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत म्हत्वाची बातमी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:जर तुम्ही असंगठिक कामगार असाल व तुमचं मासिक उत्पन्न 15 हजार रुपयांहून कमी असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही ई-श्रम पोर्टलवर तुमची नोंदणी करू शकता. यामुळे  कोणतीही दुर्घटना व आजारपणादरम्यान

 येणाऱ्या खर्चाच्या चिंतेपासून मुक्त होऊ शकता. ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा अपघात झाल्यास कामगारांना दोन लाखांचा विमा मिळणार आहे. तसेच कुटुंबासाठी वार्षिक 5 लाखांपर्यंतचं आरोग्य सुरक्षा कवच देणाऱ्या आयुषमान योजनेतही समावेश होतो.

तसेच, आणीबाणीच्या प्रसंगी सरकारी मदतही उपलब्ध होईल.कोणत्याही मदतीसाठी हेल्पलाइन नंबर 14434 वर संपर्क साधू सकता. तसेच www.gms.eshram.gov.in पोर्टल मार्फत कोणतीही तक्रार दाखल करु शकता. असंघटित कामगारांमध्ये बांधकाम कामगार, घर काम करणारे कामगार, रिक्षाचालक, फेरीवाले,

स्थलांतरित आणि प्लॅटफॉर्म कामगार, कृषी कामगार, मनरेगा कामगार इत्यादींचा समावेश होतो. परंतु, यांचं मासिक उत्पन्न 15 हजार रुपयांहून कमी असणं गरजेचं आहे. जर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डाला लिंक पाहिजे, तर तुम्ही स्वतः नोंदणी करता येईल. यासाठी तुम्हाला ई-श्रम पोर्टल www.eshram.gov.in वर भेट द्यावी लागेल.

ज्यांच्या आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक नाही, त्यांना नोंदणी करण्यासाठी सीएससीला जावं लागेल. अशा कामगारांची नोंदणी बायोमॅट्रिक पद्धतीनं केली जाईल. ई-श्रम कार्डाला सीएससीकडून कागदावर प्रिंट करुन कामगारांना दिलं जाईल. तसेच इथे नोंदणी करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही.

कोण करु शकतं नोंदणी? :

असे कामगार, ज्यांचं वय 16 ते 59 वर्षे आहे आणि कर्मचारी भविष्य निर्वाह संस्था (EPFO) किंवा राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) जे या सुविधांचे लाभार्थी नाहीत.

असे कामगार, जे आयकर भरण्यासाठी पात्र नाहीत.

असे कामगार, जे सरकारी कर्मचारी नाहीत.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!