Friday, December 3, 2021

पेट्रोल नंतर डिझेलचीही शंभरीकडे वाटचाल; तिसऱ्या दिवशी दरवाढ

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशात मागील चार दिवसांमध्ये डिझेलचा भाव तिनदा वाढलाय. तीन दिवसांमध्ये डिझेल लिटरमागे ७० पैशांनी महागले आहे. भारतीय तेल कंपन्यांनी २४ सप्टेंबर रोजी २० पैशांनी तर २६ सप्टेंबर रोजी २५ पैशांनी डिझेलचा प्रति लिटर दर वाढवला होता.

आज सलग तिसऱ्या दिवशी २५ पैशांनी डिझेलचा दर वाढवण्यात आलाय. डिझेल सप्टेंबर महिन्यामध्ये ७० पैशांनी महागलं आहे.आज म्हणजेच सोमवारी २७ सप्टेंबर २०२१ रोजी सलग तिसऱ्या दिवशी इंधनाच्या दरांमध्ये वाढ झालीय. सरकारी तेल कंपन्यांनी डिझेलचे दर २५ पैशांनी वाढवले आहेत.

तर पेट्रोलचे दर मात्र स्थिर ठेवण्यात आलेत. मागील चार दिवसांमध्ये डिझेलचे दर ७० पैशांनी वाढलेत. देशामध्ये पेट्रोल डिझेलचे वाढते दर हे सर्वसामान्यांसाठी चिंतेची बाब ठरत आहेत.इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या आकडेवारीनुसार देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीमध्ये आज सोमवारी सलग २२ व्या दिवशी पेट्रोलचे दर १०१.१९ रुपये प्रती लिटरवर स्थीर आहेत.

तर डिझेलच्या दरांमध्ये २५ पैशांची वाढ झाल्याने ते ८९.३२ रुपये प्रती लिटरवर पोहचले आहेत. मुंबईमध्येही प्रति लिटर पेट्रोलसाठी १०७.२६ रुपये मोजावे लागत आहेत. तर डिझेलचा दर मात्र शंभरीकडे वाटचाल करताना दिसत आहे.देशामधील तिन्ही तेल कंपन्या एचपीसीएल, बीपीसीएल आणि आयओसी रोज

सकाळी सहा वाजता इंधनाच्या नवीन दरांची घोषणा करतात. या नव्या दरांची माहिती त्यांच्या वेबसाईटवर मिळते. तर दुसरीकडे फोनवरही एसएमएस करुन नवीन दर तपासण्याची सुविधा देण्यात आलीय. 92249 92249 क्रमांकावर एसएमएस पाठवून पेट्रोल डिझेलच्या नवीन दरांबद्दल माहिती मिळवता येते.

RSP < स्पेस > पेट्रोल पंप डिलरचा कोड लिहून 92249 92249 वर पाठवावा.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!