Saturday, November 27, 2021

आमदार लंकेंनी रुग्णालयात महिला डॉक्टरला अभ्रद शिवीगाळ केली त्यावर काय कारवाई करणार?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पुणे महापालिकेतील महिला अधिकाऱ्याला करण्यात आलेला शिवीगाळ प्रकरणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी भाजपवर आणि आमदार सुनील कांबळेंवर याप्रकरणी तुफान टीका केली. ज्याला आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

‘तुम्हाला काय वाटतं हे सगळं करुन होणाऱ्या अत्याचारांवर आम्ही बोलणार नाही? तुमची तर सालटीच काढू.’ असं म्हणत चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्यावर देखील गंभीर आरोप केले. ‘निलेश लंके यांनी ग्रामीण रुग्णालयातील

महिला डॉक्टरला अभ्रद शिवीगाळ केली होती. त्यावर काय कारवाई करणार?’ असा सवालही यावेळी चित्रा वाघ यांनी यावेळी विचारला आहे.’कुठल्याही पक्षाचे कोणतेही लोकप्रतिनिधी असू दे. त्यांनी त्याठिकाणी आपली भाषा ही नीटच वापरायला पाहिजे. दुसरं उदाहरण देते. पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेस

 पक्षाचे त्या ठिकाणचे आमदार निलेश लंके याने तर पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी आणि तेथील महिला डॉक्टर यांना अभ्रद शिवीगाळ केली. ती शिवीगाळ एवढी घाणेरडी होती की, त्याठिकाणी त्या दोघी त्या दिवसापासून तिथे येतच नाहीएत.’

‘आता फरक एवढा आहे की, सुनील कांबळे जे ते म्हणतायेत की, माझा आवाज नाही. पण जी कथित क्लिप समोर येतेय ज्यामध्ये त्यांचा फोटो दिसतोय त्याची क्लिप आहे. निलेश लंकेने केलेल्या घाणेरड्या, अभद्र शिवीगाळीची क्लिप नाही म्हणजे ते योग्य आहे असं म्हणायचं का?’

या कुठल्याही गोष्टीचं आम्ही कधीही समर्थन करणार नाही. पण म्हणून अशा गोष्टींचा आधार घेत जे टार्गेट करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाला होतोय त्याचा मात्र निषेध आहे. ज्या बोलणाऱ्या सगळ्या आहेत त्यांची तर कीव वाटते मला. एवढ्या घटना होताना त्याठिकाणी तुमचा आवेग कुठे जातो? पण चित्रा

वाघवर बोलायला, भाजपवर बोलायला सगळे पुढे येतात. चालू दे.. त्यांना शुभेच्छा आहेत माझ्या. पण हाच जोर कायम ठेवा घडणाऱ्या घटनांसाठी सुद्धा आणि तिथे सुद्धा आवाज उठवा.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!