Wednesday, December 8, 2021

तुमची तर सालटीच काढू’, चित्रा वाघ यांचं राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पुणे महापालिकेतील महिला अधिकाऱ्याला करण्यात आलेला शिवीगाळ प्रकरणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी भाजपवर आणि आमदार सुनील कांबळेंवर याप्रकरणी तुफान टीका केली. ज्याला आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

‘तुम्हाला काय वाटतं हे सगळं करुन होणाऱ्या अत्याचारांवर आम्ही बोलणार नाही? तुमची तर सालटीच काढू.’ असं म्हणत चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्यावर देखील गंभीर आरोप केले.

‘निलेश लंके यांनी ग्रामीण रुग्णालयातील महिला डॉक्टरला अभ्रद शिवीगाळ केली होती. त्यावर काय कारवाई करणार?’ असा सवालही यावेळी चित्रा वाघ यांनी यावेळी विचारला आहे.कुठल्याही पक्षाचे कोणतेही लोकप्रतिनिधी असू दे. त्यांनी त्याठिकाणी आपली भाषा ही नीटच वापरायला पाहिजे. दुसरं उदाहरण देते.

पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्या ठिकाणचे आमदार निलेश लंके याने तर पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी आणि तेथील महिला डॉक्टर यांना अभ्रद शिवीगाळ केली. ती शिवीगाळ एवढी घाणेरडी होती की, त्याठिकाणी त्या दोघी त्या दिवसापासून तिथे येतच नाहीएत.’

‘आता फरक एवढा आहे की, सुनील कांबळे जे ते म्हणतायेत की, माझा आवाज नाही. पण जी कथित क्लिप समोर येतेय ज्यामध्ये त्यांचा फोटो दिसतोय त्याची क्लिप आहे. निलेश लंकेने केलेल्या घाणेरड्या, अभद्र शिवीगाळीची क्लिप नाही म्हणजे ते योग्य आहे असं म्हणायचं का?’

‘आता कसं झालंय… की, कुठेच काही मिळत नाहीए. मग काय करायचं जुन्या क्लिप काढायच्या… त्या असतील-नसतील त्यामध्ये आणखी त्यात एडिटिंग करायचं. मी या वादात पडणार नाही की, तो आवाज सुनील कांबळेचा आहे किंवा नाहीए. असेल तर करा कारवाई. नसेल तर काय करायचं ते बघू. आता ते चाललेत त्यांनी मला सांगितलं. ताई मी पोलीस स्टेशनला चाललोय एफआयआर दाखल करायला.’

‘पण ओढून-ताणून ज्या पद्धतीने भाजपच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना जे कोणी असतील त्यांना कुठेतरी फ्रेममध्ये बसवायचं. तुम्हाला काय वाटतं हे सगळं करुन होणाऱ्या अत्याचारांवर आम्ही बोलणार नाही? तुमची तर सालटीच काढू. तुम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांना, आमदारांना पुढे करुन ज्या पद्धतीने चिखलफेक करताय त्याने तुमचे अपराध काही थांबत नाहीत.

354 ला पण आम्ही तोंड देऊ, ही काय कसली क्लिप आली आहे त्याला देखील तोंड देऊ. पण त्यामुळे या ज्या काही घटना घडतायेत त्याचं समर्थन नाही. त्यावर तुम्ही काय बोलताय हे सांगा. म्हणून शहाणपणा शिकवण्याची गरज नाही.’

‘या कुठल्याही गोष्टीचं आम्ही कधीही समर्थन करणार नाही. पण म्हणून अशा गोष्टींचा आधार घेत जे टार्गेट करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाला होतोय त्याचा मात्र निषेध आहे. ज्या बोलणाऱ्या सगळ्या आहेत त्यांची तर कीव वाटते मला.

एवढ्या घटना होताना त्याठिकाणी तुमचा आवेग कुठे जातो? पण चित्रा वाघवर बोलायला, भाजपवर बोलायला सगळे पुढे येतात. चालू दे.. त्यांना शुभेच्छा आहेत माझ्या. पण हाच जोर कायम ठेवा घडणाऱ्या घटनांसाठी सुद्धा आणि तिथे सुद्धा आवाज उठवा.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!