Friday, December 3, 2021

किसान सभा-काँग्रेसकडून नेवासा-शेवगाव रस्त्यातील खड्ड्यात वृक्षारोपण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

तालुक्यातील भेंडा येथे नेवासा-शेवगाव रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण करून नेवासा तालुका किसान सभा व नेवासा तालुका काँग्रेसने सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध केला.

नेवासा ते शेवगाव महामार्गावर मोठं-मोठाली खड्डे पडली असून रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे.या खड्डयामुळे अनेक अपघात झाले आहेत.अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागलेला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक वेळा पाठपुरावा केल्याने नेवासा फाट्याकडून कुकाण्याकडे खड्डे भरण्याचे काम सुरू केले.मात्र हे काम अत्यन्त संथ गतीने व निकृष्ट दर्जाचे होत आहे.काल भरलेला खड्डा आज पुन्हा उखडलेला दिसून येत आहे.
महिन्यापासून सुरू असलेल्या खड्डे भरण्याचे कामाची गती वाढवावी,काम करणाऱ्या लोकांच्या टोळ्या वाढवून एकाच वेळी भानस हिवरे ते सौंदाळा,
सौंदाळा ते भेंडा, भेंडा ते कुकाणा, कुकणा ते चिलेखनवाडी आणि नेवासा फाटा ते नेवासा, नेवासा ते पाचेगाव फाटा या हद्दीतील रस्त्याचे काम एकाच वेळी सुरू करून खड्डे बुजवावीत अशी मागणी करण्यात आली.या मागणी कडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी आज सकाळी भेंडा येथे बसस्थानक चौक परिसरात नेवासा-शेवगाव रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात किसान सभा व काँग्रेसने वृक्षारोपण केले.
यावेळी किसान सभेचे नेते कॉ.बाबा आरगडे,काँग्रेस
चे तालुका अध्यक्ष संभाजी माळवदे,कॉ.आप्पासाहेब वाबळे,कॉ.भारत आरगडे,वसंतराव फटांगडे,रामभाऊ पाउलबुद्धे,संजय फुलमाळी आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!