माय महाराष्ट्र न्यूज:शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात महिलांना आता एसटी प्रवासांत सरसकट ५० टक्के सूट मिळणार आहे.
यासोबतच ईलेक्ट्रीक बसेस खरेदी आणि शंभरपेक्षा जास्त बसस्थानकांची पुनर्बांधणी करण्याची घोषणाही या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.महिलांसाठीच्या या घोषणेचे स्वागत सर्व थरातून
होत आहे. यामुळे एसटीची प्रवाशी संख्या वाढण्यास मदत होईल, मात्र सवतलीचा परतावा देण्याचा वाईट अनूभव बघता, यावेळी सरकारने एसटीला वेळेवर परतावा द्यावा नाही तर एसटी अधिक
गाळात जायला वेळ लागणार नाही. असा इशारा एसटी अधिकारी, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्याच अर्थसंकल्पात एसटीच्या तिकीटदरात महिलांसाठी ५० टक्के सवलत
देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुले महिलांना आता निम्म्या दरात एसटी प्रवास करता येईल. विशेषता ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना लाभदायी ठरणार आहे. प्रवासी संख्या आणि महसूलात
देखील या निर्णयामुळे वाढ होण्याची शक्यता आहे.आधीच कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी महामंडळाचा आर्थिक डोलारा कोसळला आहे. प्रवासी संख्य़ा घटली, उत्पन्नही घटले. कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेवर होत नाही.
त्यामुळे महिलांना प्रवास सवलतीचा निर्णय चांगला आहे. मात्र सरकारने या योजनेच्या पैशांचा परतावा एसटी महामंडळास वेळेत द्यावा अशी मागणी कर्मचारी,अधिकाऱ्यांची आहे.लाभार्थ्यांची संख्या दुपट्ट होणार महाराष्ट्र शासन एसटी महामंडळाच्या
माध्यमातून सुमारे २९ विविध सामाजिक घटकांना ३३ टक्के पासून १०० टक्के पर्यंत प्रवासी भाड्यात सवलत देते. आज घोषणा केलेली सवलत ३० वी आहे. या सवलतीच्या रक्कमेचा परतावा राज्य सरकारकडून केला
जातो. वेगवेगळी सवलत मिळणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या ३८ कोटीवर गेलेली आहे. या ताज्या निर्णयामुळे लाभार्थ्यांची संख्या दुपट्टीवर जाणार असल्याचा अंदाज एसटी महामडंळाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.