Tuesday, November 30, 2021

राज्यातील कृषि पदविका विद्यार्थ्यांना कडूस पाटील यांच्या मुळेच न्याय – चांदूरकर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आज कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी पदविका विद्यार्थ्यां ना थेट दुसर्या वर्षात प्रवेश देण्याचा प्रलंबित निर्णय घेतला असल्याचे समजते. कृषि पदवीधर संघटनेच्या पदविका आघाडी ने विद्यार्थ्यां करता केलेल्या प्रयत्नाला यश मिळालं सर्व कृषी पदविका विध्यार्थी मित्राचं अभिनंदन तसेच कृषि पदविका आघाडी पदाधिकारी

यांचं सुद्धा अभिनंदन असा संदेश राज्य कृषि पदवीधर संघटनेच्या अध्यक्ष श्रीमती मंगल कडूस पाटील यांनी संघटना च्या पदविका कार्यकर्त्यांना दिला आहे. गेल्या कित्येक महिन्या पासून कृषि पदवीधर संघटना कृषि पदविका विद्यार्थ्यां च्या प्रश्न साठी सर्वांचे लाडके नेते महेश कडूस पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढत होती,

ज्या पद्धतीने कृषि संजवानी सप्ताह बंद पडण्या पासून तर मंत्रालय भेटी पर्यंत नव्हे तर दिल्ली मधे केंद्रीय कृषिमंत्री यांच्या पर्यंत सर्वच प्रयत्न संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कृषिभूषण महेश कडूस पाटील यांनी केले. इतरांनी फक्त यात पक्ष आणि संघटना आणण्यासाठी प्रयत्न केले. मुंबई पर्यंत मंत्री महोदय यांच्या पर्यंत वारंवार पोचणारी फक्त एकच कृषि पदवीधर संघटना होती

 असे पदविका चे प्रमुख मेहेर चांदूरकर यांनी म्हटले आहे. हा निर्णय झाला यात तरी पदविका विद्यार्थी मित्रां साठी श्रेयस भोसले , अभिजित घोरड ,भूषण तिरुख यांच्या सारख्या अनेक पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यां साठी लढा चालू ठेवला. तरी कृषि पदवीधर संघटनेच्या पदविका आघाडी कडून झालेली आज पर्यंत चे संपूर्ण प्रयत्न खाली देण्यात आले आहे.

१)सर्व प्रथम २६ मे रोजी अकोला विद्यापीठ डीन भाले सर याना ऑनलाईन निवेदन मोहीम राबवण्यात आली यात एक हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.

*(२)* १ जून रोजी प्रदेशाध्यक्ष मेहेर चांदूरकर यांनी कृषि अधिष्ठाता अकोला नागदिवे सर यांच्या सोबत फोन द्वारे संपर्क साधला व संपुर्ण चर्चा व सातत्याने मागणी लावून धरली.

*(३)* २६ मे रोजी केलेली मोहीम याची बातमी ३ जून रोजी देशोन्नती पेपरला विदर्भात छापून आली.

*(४)* त्याच दिवशी htnews india ३ जून रोजी पुन्हा विदर्भात बातमी आली.

*(५)* त्याचं दिवशी विदर्भ कल्याण ३ जून पपर बातमी आली.

*(६)* १० जून रोजी माननीय कृषि मंत्री दादाभाऊ भुसे याना निवेदन ऑनलाईन निवेदन मोहीम राबवण्यात आली.

*(७)* ११ जून रोजी संस्थापक अध्यक्ष महेश कडूस साहेब यांनी फोन वरून कृषिमंत्री दादाभाऊ भुसे यांच्या सोबत स्वतः चर्चा केली.

*(८)* १७ जून रोजी प्रदेशाध्यक्ष मेहेर चांदुरकर यांनी कॅल् द्वारे अकोला विद्यापीठ मधील डीन भाले सर व कृषिअधिष्ठा नागदिवे सर यांचे सोबत पुन्हा सोबत चर्चा केली.

*(९)* २० जून रोजी राहुरी विद्यापीठ मध्ये डीन पाटील सर यांना ऑनलाईन निवेदन मोहीम राबवण्यात आली.

*(१०)* २२ जून रोजी संस्थापक अध्यक्ष महेश साहेब कृषिमंत्री यांची मुंबई मध्ये पदविका विद्यार्थ्यां सह भेट घेतली.

*(११)* २५ जून रोजी दादा भाऊ भुसे नाशिक दौऱ्या वर असताना नाशिक पदविका पदाधिकारी यांनी घेराव घालून निवेदन दिले.

*(१२)* २७ जून रत्नप्रभा दर्पण मधे भुसे साहेब यांना निवेदने विद्यार्थी यांनी दिल्या ची बातमी आली.

*(१३)* २८ जून माय मराठी ला विद्यार्थी यांनी नाशिक मधे निवेदने दिली ही बातमी आली.

*(१४)* २८ जून संस्थापक अध्यक्ष महेश साहेब यांनी कृषिमंत्र्यालय येतील महत्वाच्या व्यक्ती सोबत फोन वर पुन्हा चर्चा केली.

*(१५)* २९ जून दैनिक साहसिक मधे बातमी आली.

*(१६)* २९ जून रोजी संस्थापक महेश पाटील साहेब यांनी कृषिमंत्री दादाभाऊ भुसे यांची मुंबई इथे घेतली भेट पुन्हा भेट.

*(१७)* १ जुलै रोजी पदविका पदाधिकारी यांनी कृषि संजवानी मोहीम समारोह महेश कडूस पाटील यांच्या आदेशावरून लाईव्ह अक्षरशः बंद पाडला. या नंतर शासन गंभीर झाले. हा आदेश आपले नेते महेश कडूस पाटील यांनी दिला राज्यातील कार्यकर्ते यांनी तो पाळला. पण लाईव्ह बंद पाडल्या च्या बातम्या भाजप पदाधिकारी यांनी लावल्या. पण सत्य आपले विद्यार्थी यांना माहीती आहे.

*(१८)* १ जुलै रोजी माय महाराष्ट्र ला समारोह बंद पाडण्याची ब्रेकींग न्युज आली.

*(१९)* ४ जुलै रोजी संस्थापक महेश साहेब पुन्हा स्वतः पदविका विद्यार्थ्यां सोबत मुंबई ला मंत्रालयात जाऊन भेट घेतली. तो पर्यंत तोडगा निघाला नाही.

*(२०)* ६ जुलै रोजी संस्थापक महेश साहेब यांनी सायंकाळी पुणे तसेच राहुरी मधील महत्वाचे व्यक्ती सोबत कॅल् वरून चर्चा केली.

*(२१)* १८ जुलै रोजी किसान भारती या कृषि पदवीधर संघटनेच्या मुखपत्रात राज्यातील मध्ये पदविका विद्यार्थ्यां वर होणाऱ्या अन्याया बद्दल महेश कडूस पाटील यांनी टिका करणारा लेख लिहून प्रसिद्ध केला.

*(२२)* १३ जुलै रोजी दिल्ली येथे कृषि मंत्री माननीय कैलाश चौधरी यांचे स्वीय सहायक आयएएस माननीय शिंदे सो यांची संघटना नेते महेश कडूस पाटील यांनी पदविका प्रश्नां वर भेट घेतली.

*(२३)* २६ जुलै रोजी संचालक कौसडीकर सर कृषि शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांच्या सोबत संस्थापक अध्यक्ष महेश कडूस साहेब यांनी पुन्हा विनंती करत फोन द्वारे चर्चा केली.

*(२४)* १६ आगस्ट रोजी संचालक कौसडीकर सर
कृषि शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांच्या सोबत संस्थापक अध्यक्ष कडूस पाटील साहेब यांनी भेट घेऊन चर्चा केली.

*(२५)* ३० ऑगस्ट रोजी पदविका आघाडी प्रदेशाध्यक्ष मेहेर चांदुरकर तसेच अभिजित घोरड विदर्भ अध्यक्ष व ऋषिकेश काकड ,सुरज वानखडे अकोला प्रमुख यांनी अकोला विद्यापीठ कृषिअधिष्ठा मा.डॉ.एम.बी.नागदेवे सर यांची भेट घेतली.

*(२६)* ११सप्टेंबर रोजी मा. कृषिमंत्री दादाभाऊ भुसे जळगाव दौऱ्यावर असताना संघटनेचे युवक अध्यक्ष फकिरचंद पाटील यांनी पदविका विद्यार्थी यांच्या बद्दल लवकरात लवकर निर्णय घेऊन त्याच्या हिताचं निर्णय द्यावा म्हणून निवेदन दिले.

*अशा असंख्य विद्यार्थी व कृषि पदवीधर संघटना च्या कट्टर कार्यकर्ते यांनी केलेल्या कष्टाने हा निर्णय झाला आहे. यात कोणत्याही एका पक्षाने किंवा नेत्यांनी मुंबई दिल्ली वारी सामान्य विद्यार्थी यांच्या करता केली नाही. आज आपण सगळे खरोखर जिंकलो आहोत. जय जवान जय किसान जय कृषि पदवीधर संघटना अशी प्रतिक्रिया महेश कडूस पाटील यांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!