Friday, December 3, 2021

कर्जत-जामखेड पुन्हा चर्चेत! आमदार रोहित पवार – माजी मंत्री राम शिंदेचा पुन्हा सामना

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. युवा आमदार रोहित पवारांनी भाजपचा हा बालेकिल्ला बळकावल्यानंतर भाजप सैरभैर झाली आहे. दररोज एकेक कार्यकर्ते, नेते राष्ट्रवादीची वाट धरीत आहेत.

आगामी नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादीत मेगा भरती सुरू असली तरी काँग्रेसच अस्वस्थ आहे. कारण शहरात राष्ट्रवादीऐवजी काँग्रेसची माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले यांच्या माध्यमातून ताकद आहे. राष्ट्रवादी बळकट झाल्यास राजकीय गणिते बदलण्याची शक्यता आहे.

भाजपाचे दिग्गज नेते माजी मंत्री राम शिंदे यांनीही गेलेला गड मिळवण्यासाठी रणनीती आखली आहे. काही नेते त्यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. आस्थेवाईकपणे चौकशी करीत कर्जत शहरासह परिसर पिंजून काढीत भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री प्रा.राम शिंदे

एक्शन मोडवर आले आहेत. एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कर्जत जामखेडमध्ये आमदार रोहित पवार यांनी विजय मिळवित मुसंडी मारली. त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेले राष्ट्रवादी इन्कमिंगचे नेटवर्क विस्तारले आहे. मोठे मासे त्यांच्या गळाला लागले आहेत. अलीकडे भाजपची पडझड झाली आहे.

सर्व वातावरण विरोधात गेलेले असताना न खचता पुन्हा एकदा नव्या-जुन्या कार्यकर्त्यांची मोट बांधण्यास शिंदे यांनी सुरूवात केली आहे. जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर, सरपंच काकासाहेब धांडे, किसान सेलचे सुनील यादव, तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे,

भाजप शहराध्यक्ष वैभव शहा, युवक नेते गणेश क्षीरसागर, युवक नेते दादासाहेब सोनमाळी, युवा मोर्चाचे विनोद दळवी, पप्पू धोदाड,अनिल गदादे, महिला आघाडीच्या मनीषा वडे, शरद म्हेत्रे, सोशल मीडियाचे गणेश पालवे यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!