Tuesday, November 30, 2021

माजी आमदार मुरकुटेंची पक्षातून हाकलपट्टी करा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: नेवासा शहरातील भाजपाचे नगरसेवक रणजित सोनवणे व दिनेश व्यवहारे यांचे काल जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या आदेशावरून पक्षातून निलंबन करण्यात आले आहे. आज या दोन्ही नगरसेवकांनी याबाबत खुलासा दिला आहे.

याबाबत वॉर्ड क्रमांक ९ चे नगरसेवक रणजीत सोनवणे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की , आम्ही अनेक वर्षापासून भाजपचे काम तन, मन, धनाने करतो आणि पक्ष म्हणजे एक कुटुंबच मानतो.२०१४ च्या निवडणुकीत ऐन वेळी उडी मारून भाजपात आलेल्या मा.आ. बाळासाहेब मुरकुटे यांना निवडून आण्यासाठी आम्ही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले.

नेवासा नगरपंचायतच्या निवडणुकीतही शर्थीचे प्रयत्न करून भाजपाची सत्ता नगरपंचायत मध्ये आणली. मात्र फक्त स्वार्थासाठी भाजपात आलेल्या मुरकुटे यांच्या पत्नी भेंडा गटाच्या काँग्रेस पक्षाच्या जि. प. सदस्य होत्या, मा. मा.आ.मुरकुटे यांनी स्वतःच्या पत्नीचा काँग्रेस सदस्य पदाचा राजीनामा घेण्याचे धाडस दाखवले नाही.

स्वतःच्या पत्नीलाही भाजपामध्ये अधिकृतरित्या ते आणू शकले नाहीत.पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करण्या ऐवजी त्यांनी नेहमी भाजपा विरोधी पक्षासोबत व्यक्तिगत तडजोडी करत पक्ष हिताला हरताळ फासला व स्वतःच्या कुटुंबाचा व नातेवाईकांचा आर्थिक फायदा करून घेतला. असे प्रसिद्धी प्रत्रकात

नगरसेवक रणजित सोनावणे यांनी म्हंटले आहे. तर प्रभाग क्र. १५ चे नगरसेवक दिनेश व्यवहारे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात मुरकुटे यांच्या नाकर्तेपणामुळे नेवासा मतदार संघातील आमदारकीची जागा गमवावी लागली आहे.

पक्षासाठी मुरकुटेंचे काही योगदान नसूनही पक्षा आदेश मानून मुरकुटे यांचे दोन्ही विधानसभा निवडणुकीत मी निष्ठेने काम केले होते. मात्र निवडणुकी नंतर काही काळातच न्यूनगंडाने पछाडलेल्या मुरकुटे यांनी नेवासा तालुक्यात भाजप पक्ष प्रायव्हेट कंपनी करण्याचा प्रयत्न केला. ज्यांना गावात कोणी ओळखतही नाही,

अथवा त्या व्यक्तीचे पक्ष वाढीसाठी कुठलेही योगदान नसताना देखील भाजपाचे तालुकाध्यक्ष करून स्वतःच्या हातचे बाहुले म्हणून तालुकाध्यक्ष केले आहे.कुठलेही पक्ष विरोधी काम केले नसतानाही दुसरा माणूस नेतृत्व करू नये या भावनेतून माझे निलंबन करण्यात आले आहे.

ही बाब पक्षहिताला बाधा आणणारी आहे. पक्ष विरोधी कारवाई करणाऱ्या मुरकुटे यांची भाजपातुन त्वरित हकालपट्टी करण्यात यावी, अन्यथा येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत निवडणुकीतून भारतीय जनता पार्टी हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही. पक्षश्रेष्ठींनी निष्ठावंत भाजप

कार्यकर्त्यांना योग्य न्याय देण्याची मागणी प्रसिद्धी पत्रकात करण्यात आली आहे. यामुळे भाजपच्या पक्षांतर्गत उथळ्या चव्हाट्यावर आल्याने तालुक्यात हा चांगलाच चर्चेचा विषय ठरत असल्याचे दिसत आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!