Wednesday, December 8, 2021

नगर विधान परिषदेसाठी जगताप-घुले-शेलार यांच्या नावाची जोरदार चर्चा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राहुल कोळसे :विधान परिषदेची निवडणूक जशी जवळ येत आहे. तसेच आता जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आलेला आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाऊगर्दी झालेली दिसून येत आहेत.

त्यातच बाहेरील पक्षातून राष्ट्रवादीत येऊन विधान परिषदेसाठी एक-दोन नेते तयार आहेत. या इच्छुकांच्या गर्दीत मात्र सर्वसामान्य कार्यकर्तेंंनी माजी आमदार चंद्रशेखर घुलेंनी यांनाच पक्षाने उमेदवारी देऊन त्यांच्या पदरात एकनिष्ठेचे फळ टाकावे, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे.

विधान परिषदेची निवडणुकीला अवधी असला तरी सध्या कोण निवडणुकीला उभे राहिल, याची चर्चा सध्या सुरु झालेली आहे. काहींनी तर मताची आकडेवारी जुळवाजुळव सुरु केलेली आहे. त्यासंदर्भात काहींनी जिल्ह्यातीलच नेत्यांबरोबर प्राथमिक चर्चा केलेली असल्याचेही कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे.

विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून सध्या विद्यमान आमदार अरुण जगताप, माजी आमदार चंद्रशेखर घुले, ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार, ज्येष्ठ नेते प्रताप ढाकणे, माजी आमदार राहुल जगताप यांच्या नावाची सध्या चर्चा सुरु झालेली आहे. परंतु या नावांमध्ये सर्वात वरच्यास्थानी दादाभाऊ कळमकर यांचे नाव चर्चेत आहे.

जिल्ह्यातील इतर नेत्यांना पक्षाने वेळोवेळी संधी देऊन त्यांचे पुर्नवसन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. चंद्रशेखर घुले पाटील यांच्याबाबतीतही पक्षाने वेळोवेळी संधी देऊन तसा प्रयत्न केलेला आहे. मात्र त्यांची पक्षाबाबत असलेली एकनिष्ठपणा पाहून पक्षाने त्यांना आता संधी देण्याची गरज आहे.

राष्ट्रवादी पक्षाच्या बांधणीपासूनच ते पक्षात आहेत. त्यांनी पक्षाला अडचणीच्या काळात साथ देऊन संघटनांत्मक बांधणी केलेली आहे. त्याचा फायदा पक्षाला शहरासह जिल्ह्यात होत आहे. आता त्यांना पक्ष निष्ठेचे फळ आता देण्याची गरज आहे. त्यामुळे आगामी विधान परिषद निवडणुकीत चंद्रशेखर घुलेंना संधी द्यावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.

राज्यात सत्ता आल्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसने उत्तरेत मंत्रीपद दिलेले आहेत. तसेच साईबाबा संस्थानचे अध्यक्षपदही उत्तरेत दिलेले आहे. मात्र दक्षिणेत मंत्री पद मिळालेले नाही. त्यामुळे आता विधान परिषद निवडणुकीत दक्षिण लोकसभा मतदार संघातीलच उमेदवाराला संधी देऊन राष्ट्रवादीने आगामी निवडणुकांसाठी बांधणी करणे गरजेचे आहे.

चंद्रशेखर घुलेंना संधी दिल्यास त्याचा आगामी लोकसभा निवडणुकीत शहरातील मतांमध्ये मोठी वाढ होण्यास मदत होऊ शकते, अशी चर्चा सध्या राष्ट्रवादीच्या गोटात सुरु आहे. त्यामुळे पक्षाने दादाभाऊ कळमकर यांच्या नावाचा विचार करणे गरजेचे असल्याचे मतही राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्त्यांमधून व्यक्त केले जात आहे.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!