Friday, December 3, 2021

ड्रायव्हिंग लायसन्सबाबत:बाबत केंद्र सरकारची मोठी घोषणा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोणतंही वाहन चालवण्यासाठी तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजेच वाहन चालवण्याचा परवाना असणं आवश्यक आहे. केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्सबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार आता कार उत्पादक कंपन्या , ऑटोमोबाइल

असोसिएशन आणि एनजीओ यांना ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची परवानगी असेल. या संस्था त्यांच्या ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या उत्तीर्ण चालकांना ड्रायव्हिंग लायसेन्स देऊ शकणार आहेत.त्यामुळे आता तुम्हाला लर्निंग लायसन्ससाठी परिवहन विभागाच्या कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज पडणार नाही.

वाहनांच्या नोंदणीसाठी मात्र आरटीओमध्ये जावं लागणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यासंदर्भात नोटीस जारी केली आहे. प्रादेशिक परिवहन विभागाकडूनही पूर्वीप्रमाणे ड्रायव्हिंग लायसन्स देणंही सुरू राहणार आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, आता कार उत्पादक कंपन्या, ऑटोमोबाइल असोसिएशन आणि NGO ला देखील ड्रायव्हिंग लायसन्ससाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आता या संस्था ड्रायव्हिंग टेस्टमध्ये उत्तीर्ण उमेदवारांना ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकणार आहेत.

ड्रायव्हिंग लायसन्स आणि त्याच्याशी निगडित सेवा-सुविधांविषयी सातत्याने मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातात. विशेषतः अलीकडच्या काळात उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, दिल्ली -एनसीआर आणि झारखंडसारखी राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांनी लर्निंग लायसन्स आणि वाहनांच्या नोंदणीसाठी

नवीन नियम लागू केले आहेत. तसंच काही राज्यांमध्ये अजूनही याकरता केवळ ऑनलाइन माध्यमातूनच अर्ज स्वीकृती होते.कोरोना काळानंतर, देशातल्या जवळपास सर्व राज्यांच्या परिवहन विभागाने लर्निंग लायसन्ससाठी फी जमा करण्याकरता असणाऱ्या पद्धतीत बदल केला आहे.

नव्या पद्धतीनुसार, आता स्लॉट बुकिंग झाल्यावर लगेच लर्निंग लायसन्ससाठी पैसे जमा करावे लागतात. पैसे जमा केल्यानंतर तुमच्या सोयीनुसार तुम्हाला चाचणी परीक्षेकरता तारीख दिली जाते.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!