Wednesday, December 8, 2021

अरे बापरे! कोरोना बऱ्या झालेल्या रुग्णांना बळावतेय ही गंभीर समस्या

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोनामुळे वास न येणं, चव न लागणं अशा समस्या काही रुग्णांना जाणवत होत्या . कोरोनाची ही लक्षणं कोरोनातून बरं झाल्यानंतरही काही रुग्णांमध्ये  कायम राहत होती. पण आता तर कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना आणखी एका

विचित्र समस्येचा सामना करावा लागत आहे. कोरोनानंतर फक्त चव, वास नाही तर आता आवाजही जातो आहे.  पश्चिम बंगालच्या कोलकात्यात  असे रुग्ण आढळून आले आहेत.
कोलकात्यातल्या कोविड रुग्णांना त्यातून बरं झाल्यानंतर एका वेगळ्याच संकटाला तोंड द्यावं लागत आहे. कोविडमधून बरं झाल्यानंतर अनेकांचा

आवाज बिघडत असल्याचं दिसून आलं आहे. तज्ज्ञांच्या मते, फुप्फुसांचं फायब्रॉसिस किंवा अनेक आठवडे आवाजच न आल्यामुळे आवाजात काही बिघाड होऊ शकतो. पण त्याचं कारण सर्वस्वी कोरोना संसर्ग हे नाही. पीडित व्यक्तीच्या घशात संसर्ग झालेला असू शकतो आणि त्यामुळे ही समस्या असू शकते.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आर. एन. टागोर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूटचे सौरेन पांजा यांनी सांगितलं, लोअर रेस्पिरेटरी सिस्टीमसोबतच कोविडच्या काही पीडितांमध्ये अपर रेस्पिरेटरी सिस्टीमवरही परिणाम झाला आहे. त्यासोबतच घशाच्या इन्फेक्शनमुळे सूजही येऊ शकते. त्यामुळे आवाज काही काळासाठी पूर्णतः जाऊ शकतो. असं मानलं जात आहे,

की कोविडचा संसर्ग झाल्यानंतर पहिल्या किंवा तिसऱ्या आठवड्यापासून तीन महिन्यांपर्यंत आवाजाची समस्या राहू शकते. कोणाचाही आवाज यामुळे कायमचा जाणार नाही; मात्र ज्यांना अशी समस्या निर्माण झाली, त्यांना डिप्रेशनचा त्रास झाला.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!