Saturday, November 27, 2021

करोनामुळे मरण पावलेल्या व्यक्तीच्या वारसाला:केंद्राने पन्नास हजार दिले, राज्याने पाच लाख रुपये द्यावेत :विखे पाटील

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:करोनामुळे मरण पावलेल्या व्यक्तीच्या वारसाला केंद्र सरकार जर ५० हजार रुपयांची मदत करणार असेल तर राज्यातील महाविकास आघाडी सरकारला ५ लाख रुपयांची मदत करायला काय हरकत आहे?’ असा सवाल माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

‘लसीकरणासाठी आमचा चेक तयार आहे, असे राज्य सरकारने सांगितले होते. मात्र, केंद्र सरकारने मोफत लस उपलब्ध करून दिल्याने हे पैसे वाचले आहेत. त्याचा उपयोग करून राज्य सरकराने ही मदत तातडीने द्यावी,’ अशी मागणीही त्यांनी केली.

विखे पाटील यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना संकटात देशभरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात केलेल्या मदतीचा उल्लेख करून राज्य सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. विखे पाटील म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या माध्यामातून ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद

करून मोफत लसीकरणाची मोहीम हाती घेतली. त्यामुळे आतापर्यंत देशातील ८५ कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण होवू शकले. राज्य सरकार मात्र फक्त आमचा चेक तयार असल्याच्या वल्गना करीत बसले. त्यामुळे लसीकरणाचे वाचलेले सर्व पैसे राज्य सरकारने सामान्य माणसांच्या मदतीसाठी वापरण्याची आवश्यकता आहे.

करोना संकटात मंत्री मुंबईत बसून राहिले. मात्र आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी जीवावर उदार होवून काम करीत होते. नगर जिल्ह्यातील तिन्ही मंत्री एकही कोविड सेंटर सुरू करू शकले नाहीत. त्या उलट प्रवरा कोविड सेंटर, डॉ. विखे पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून रुग्णांना मोठी मदत होवू शकली,’ असेही विखे पाटील यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!