Tuesday, November 30, 2021

नगर जिल्ह्यातील बहिण-भावाचा रायगड जिल्ह्यातील व्यक्तीवर हनीट्रॅप अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी पुढे…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:केडगावातील बहिण-भावाने रायगड जिल्ह्यातील पनवेलच्या व्यक्तीला हनीट्रॅपच्या जाळ्यात ओढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अश्लील फोटोचा व्हिडीओ तयार करून सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत पाच लाख रूपये व तीन तोळ्याची सोन्याची चेन लुटली आहे.

8 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीत हा प्रकार घडला असून सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे. पूजा कचरे हिने फिर्यादीसोबत फोनवर गोड बोलून तिचा भाऊ विक्रम याच्या मदतीने आर्थिक परिस्थितीती हालाखीची असल्याचे भासवून फिर्यादीकडून पाच लाख रूपये घेतले.पोलिसांनी पूजा कचरे व विक्रम कचरे

(पूर्ण नावे माहिती नाही, रा. रभाजीनगर, केडगाव) यांच्याविरोधात जबरी चोरी, खंडणी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.फिर्यादी यांनी पूजाकडे पैशाची मागणी केली असता खोट्या गुन्ह्यात अडकून तसेच अश्लील फोटोचा व्हिडीओ तयार करून तो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली.

फिर्यादी यांचा वाहनाचा चालक याला धक्काबुक्की करून जबरदस्तीने फिर्यादीच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची सोन्याची चेन, दोन एटीएम काढून घेतले. पाच लाख रूपये दे, नाहीतर खोट्या गुन्ह्यात अडकून टाकू, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे करीत आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!