Monday, December 6, 2021

पुणे – अहमदनगर – औरंगाबाद हाय स्पीड रेल्वे मार्गाबाबत मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: मुंबई –नाशिक- नागपूर हाय स्पीड रेल्वेच्या कामाला गती देताना राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल मात्र याच जोडीने जालना आणि नांदेड मार्गे मुंबई ते हैद्राबाद तसेच पुणे ते औरंगाबाद देखील हाय स्पीड रेल्वेने जोडावेत अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.

मुख्यमंत्री आपल्या पत्रात म्हणतात की, प्रस्तावित मुंबई ते नागपूर हाय स्पीड रेल्वे मार्ग जालन्यापर्यंत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या जोडीनेच जात आहे. राज्य शासनाने जालना ते नांदेड दरम्यान द्रूतगती महामार्ग सुरु करण्याचे टाकण्याचे ठरविले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने

यापूर्वीच नांदेड ते हैद्राबाद ही शहरे द्रूतगती महामार्गाने जोडण्याचे ठरविले आहे. त्यामुळे जालना आणि नांदेड मार्गे मुंबई ते हैद्राबाद हा हाय स्पीड रेल्वे मार्ग संयुक्तिक ठरेल.
याशिवाय पुणे आणि औरंगाबाद ही शहरे देखील हाय स्पीड रेल्वे मार्गाने जोडावीत म्हणजे केवळ या दोन शहरांनाच नव्हे तर नाशिक

लाही त्याचा मोठा फायदा होईल. कारण सध्या मुंबई आणि नागपूर मार्गामुळे मुंबई –नाशिक- औरंगाबाद हे एकमेकांना जोडले जाणार आहेतच. मुंबई ते हैद्राबाद या मार्गामुळे मुंबई आणि पुणे देखील हाय स्पीडने जोडले जाणार आहेत. याशिवाय राज्य शासनाने पुणे ते नाशिक दरम्यान हाय स्पीड रेल्वेसारखाच मार्ग प्रस्तावित केला आहे.

त्यामुळे ही सगळी शहरे आपोआपच एकमेकाना जोडली जाऊन उद्योग –व्यवसायांना विशेषत: ऑटोमोबाईल उद्योगाला मोठे प्रोत्साहन मिळेल.

ताज्या बातम्या

ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असताना शाळा बंद राहणार का? आरोग्यमंत्री टोपेंने केले मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात सध्या ओमायक्रोनचे 8 रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागणार का अशी चर्चा रंगली आहे. पण 'अशा...

नगर ब्रेकिंग:वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी घडला. रविवारी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर...

अत्यंत धक्कादायक बातमी! ओमिक्रॉन हवेतून पसरत असल्याचा दावा

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन या कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारामुळे जगभरात भीतीचे सावट असताना चिंता वाढवणारी आणखीन एक घटना समोर आली आहे. हाँगकाँगमधील एका हॉटेलमध्ये क्वारंटाईनमध्ये...

पंतप्रधान आवासच्या नियमात मोठे बदल;तर रद्द होईल घर

माय महाराष्ट्र न्यूज:सरकारने पंतप्रधान आवास योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. अशा परिस्थितीत, हे नवीन नियम जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे अन्यथा तुम्हाला मिळालेलेल...

पीएम किसान पुढील हप्ता लवकर:यादीत तुमचे नाव आहे का ? असं चेक करा

माय महाराष्ट्र न्यूज:पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकरी 10व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. आतापर्यंत या योजनेचे 9 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचले आहेत. सरकारने 10 वा हप्ता...

सोने, चांदीच्या दरात तेजी; जाणून घ्या आजचे दर

माय महाराष्ट्र न्यूज:  आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या दरामध्ये तेजी पहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजनुसार सोन्याच्या दरात प्रति तोळा 0.15 टक्के तर...
error: Content is protected !!