Friday, December 3, 2021

नेवासा तालुक्यासाठी लाळ्या खुरकूत लसीचे 1 लाख 36 हजार डोस प्राप्त; 21530 जनावरांचे लसीकरण पूर्ण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/सुखदेव फुलारी

नेवासा तालुक्यासाठी लाळ्या खुरकूत लसीचे 1 लाख 36 हजार डोस प्राप्त झाले असून 26 सप्टेंबर अखेर एकूण 21530 जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

एप्रिल 2021 महिन्यात लाळ्याखुरकुत-घटसर्प रोगाची लागण होऊन नेवासा तालुक्यातील 123 जनावरे दगावली होती. जिल्हा परिषद पशु संवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांनी पुढाकार घेत पुण्याहून  तातडीने लसीचे 9 हजार डोस मागवून जनावरांचे लसीकरण सुरू केले होते.तातडीने लसीकरण केल्याने मुळे जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली होती.सध्या जनावरांमध्ये लंपी आजाराची लागण झालेली आढळून आलेले आहे.त्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधक उपाय योजना म्हणून तालुक्यात लाळ्या खुरकूत लसीचे लसीकरण हाती घेण्यात आलेले आहे.

नेवासा तालुक्यात एकूण 1 लाख 52 हजार पशुधन असून त्यांचे लाळ्या खुरकूत लसीकरण हाती घेण्यात आले आहे.त्यासाठी लसीचे एकूण 1 लाख 36 हजार डोस प्राप्त झालेले आहेत.
दि.17 सप्टेंबर पासून लसीकरण हाती घेण्यात आले आहे.26 सप्टेंबर अखेर गायवर्ग 19 हजार 293 व म्हैसवर्ग 2237 असे एकूण 21 हजार 530 जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

——————————————————————–
पशुवैद्यकीय दवाखाना–मिळालेले डोससंख्या–गायवर्ग–म्हैसवर्ग–लसीकरण केलेली जनावरांची संख्या
——————————————————————
नेवासा– 9200–1087–82–1169

सोनई– 17400–2952–92–3044

कुकाणा–18500–2945–719– 3664

सलाबतपुर –11600–2310–174– 2484

शिरसगाव–7100– 689–98–787

वडाळा– 7400 –831–14–845

चांदा — 10900 –1052–140– 1192

घोडेगाव– 6600 –1000–129– 1129

माका –13000 –900–300– 1200

करजगाव– 8300 –1527–127– 1654

भानस हिवरे — 9700 –1450– 15–1630

बेल पिंपळगाव– 9000 –1401–15– 1416

प्रवरा संगम– 5600 –714–102–816

वरखेड– 1700–435–65– 500

————————————————————-
एकूण– 136000–19293–2237– 21530
———————————————————–

100 टक्के लसीकरण करणार...
नेवासा तालुक्याला 136000 डोस आले असून पशु संवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख व प्रभारी जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ.अरुण हरिश्चंद्रे यांचे मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व जनावरांचे 100 टक्के लसीकरण करण्यात येणार आहे.
*डॉ.दिनेश पडूंरे*
तालुका पशुवैद्यकीय अधिकारी

तालुक्यातील कुकाणा पशुवैद्यकीय दवाखान्या अंतर्गत लाळ्या खुरकूत लसीचे 18 हजार 500 प्राप्त झाले असून दि.27 सप्टेंबर अखेर गायवर्ग 2945 व म्हैस वर्ग 719 अशा एकूण 3664 जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

*कुकाणा केंद्रा अंतर्गत गाव निहाय झालेले लसीकरण असे…*
जेऊर हैबती (899),देवगाव (1359),भेंडा बुद्रुक (100), भेंडा खुर्द (100), तरवडी (744), सुलतानपूर (120),वडूले (172), चिलेखनवाडी (95), देवसडे (75).

मरतूक आणि रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता यंत्रणा सज्ज…

याबाबद माहिती देतांना कुकाणा पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ.अमोल गायकवाड म्हणाले,पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांचे मार्गदर्शनाखाली जनावरांना लसीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे.कुकाणा पशु वैद्यकीय दवाखान्यासाठी 18 हजार 500 डोस प्राप्त झाले असून दि.17 सप्टेंबर पासून लसीकरण सुरु केले आहे.26 सप्टेंबर अखेर 3664 जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.मरतूक आणि रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता पशुसंवर्धन विभाग सज्ज झालेले आहे.
*डॉ.अमोल गायकवाड*
पशुधन विकास अधिकारी, कुकाणा

 

 

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!