Saturday, November 27, 2021

अजित पवारांचं मोठं विधान;चर्चेला उधाण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून आज राज्याच्या पर्यटन विभागाने एका छोटेखानी सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी पर्यटन विकासाला गती देणाऱ्या विविध योजनांचा शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी उपस्थित असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात काहीसा नाराजीचा सूर काढला. ‘मुख्यमंत्र्यांच्यापुढे आमचं काही चालत नाही’, असे म्हणत कार्यक्रमाच्या नियोजनावरच अजितदादांनी एकप्रकारे बोट ठेवलं.

पर्यटन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध प्रकल्पांचा शुभारंभ करताना त्यात वेळेचा बराच अपव्यय झाला. एकत्रितपणे सर्व प्रकल्पांचा शुभारंभ न करता एकेका प्रकल्पाची घोषणा करून नंतर मान्यवरांच्या हस्ते रिमोटचे बटण दाबून शुभारंभ केला जात होता. त्यावरून अजित पवार यांनी नंतर निवेदिकेची फिरकी घेतली.

‘कार्यक्रमात आज सुरुवातीपासून मी बारकाईने बघतोय. निवेदिकेने इतक्यांदा मुख्यमंत्र्यांना बसा उठा करायला लावलं… मुख्यमंत्री उठायचे तेव्हा मग आम्हालाही उठायला लागायचं आणि परत बसायला लागायचं. एकदाच काय ते सांगितलं असतं तर… आता याचं बटण दाबा, आता पुढचं बटण दाबा… म्हणजे

सगळं एकाचवेळी संपलं असतं पण तुम्हाला कोण सागणार. तुमच्या हातात माइक असल्यावर आम्हाला काही बोलताही येत नाही आणि मुख्यमंत्र्यांच्यापुढे आमचं काही चालत नाही’, अशी काहीशी नाराजी अजित पवार यांनी व्यक्त केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना भाषणासाठी आमंत्रित करण्यापूर्वी मान्यवरांना

सतत उठ-बस करावी लागल्याबद्दल निवेदिकेने दिलगिरी व्यक्त केली.पर्यटन क्षेत्रासाठी महाराष्ट्रात नवा काळ सुरू झाला आहे. आदित्य ठाकरे खूप चांगले काम करत आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम पुढच्या पाच-दहा वर्षांनंतर दिसतील. त्यादिशेने आपली वाटचाल सुरू झाली आहे, असे यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!