Tuesday, November 30, 2021

पत्रकारांच्या आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी संघटित प्रयत्न गरजेचे : रविंद्र बेडकिहाळ

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

फलटण

‘‘आज वृत्तपत्र संपादक व पत्रकारांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आहे. वास्तविक समाजासाठी झटणार्‍या पत्रकारांना शासनाने शासकीय व खाजगी रुग्णालयात प्राधान्याने आरोग्य सुविधा देणे गरजेचे आहे. मात्र शासकीय योजनेतून केवळ शासकीय अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना आणि तेही फक्त शासकीय रुग्णालयातच मोफत वैद्यकीय उपचार दिले जातात. तसेच शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीतून विविध औषधोपचार व शस्त्रक्रिया यासाठी दिल्या जाणार्‍या मदतीच्या निकषांमध्ये व आर्थिक तरतूदींमध्येही अनेक दोष आहेत. त्यामुळे शासनाच्या पत्रकारांसाठी असणार्‍या आरोग्य योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी प्राधान्याने संघटित प्रयत्न करणे गरजेचे आहे’’, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी केले.

राज्यातील वृत्तपत्र संपादकांच्या महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघ मर्या; फलटण या संस्थेची 41 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविंद्र बेडकिहाळ यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने पार पडली. त्यावेळी सभेस उपस्थित असणार्‍या राज्यातील विविध भागातील संपादकांना मार्गदर्शन करताना बेडकिहाळ बोलत होते. सभेस संस्थेचे ज्येष्ठ संचालक कृष्णा शेवडीकर (नांदेड), रमेश खोत (जालना), माधवराव पवार (नांदेड), जयपाल पाटील (अलिबाग),बाळासाहेब आंबेकर (सातारा), सौ.एम.बी.वाणी (जळगाव), अ‍ॅड.रोहित अहिवळे (फलटण), विनायक खाटके (बुलढाणा) यांची प्रमुख उपस्थिती होती.
बेडकिहाळ पुढे म्हणाले, ‘‘निवृत्त ज्येष्ठ पत्रकारांना ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजने’तून शासनाकडून दरमहा 11 हजार रुपये मानधन स्वरुपात आर्थिक मदत दिली जात आहे. मात्र या योजनेस पात्र ठरण्यासाठी अनेक जुन्या कागदपत्रांची पूर्तता पत्रकारांना करावी लागत आहे. त्यामुळे आजही अनेक ज्येष्ठ व वयोवृद्ध संपादक या योजनेपासून वंचित आहेत. या क्लिष्ट प्रक्रियेत सुधारणा आणण्यासाठी व लाभार्थ्यांना सध्या मिळणार्‍या मदतीत वाढ करुन दरमहा 25 हजार रुपये मदत मिळण्यासाठी शासनाने दरवर्षी अर्थसंकल्पात 25 कोटी रुपयांची स्वतंत्र आर्थिक तरतूद करणे आवश्यक आहे’’, असेही बेडकिहाळ यांनी यावेळी स्पष्ट केले.
‘‘गेल्या दोन वर्षांपासून कोरोना परिस्थितीमुळे छोट्या वृत्तपत्रांचे आर्थिक गणित ढासळले आहे. ही वृत्तपत्रे टिकवण्यासाठी शासनाने विशेष जाहिरात स्वरुपात आर्थिक मदत करणे आवश्यक आहे. शासकीय संदेश प्रसारण धोरणातील तरतूदींचे पालन शासनाकडूनच होत नाही. स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, राज्यशासनाचे विविध विभाग या धोरणाप्रमाणे जाहिरातींचे वितरण करत नाहीत. त्यामुळे या धोरणाच्या काटेकोर अंमलबजावणीकरिता शासनाकडे पाठपुरावा करणे आवश्यक आहे’’, असेही बेडकिहाळ यांनी यावेळी सूचित केले.

संस्थेचे ज्येष्ठ सदस्य जयपाल पाटील (अलिबाग) यांनी, ‘‘आज पत्रकारिता क्षेत्रात तरुण पिढी मोठ्या संख्येने येत आहे. त्यांना योग्य प्रशिक्षणासाठी संस्थेच्यावतीने राज्यात विभागवार पत्रकार कार्यशाळांचे आयोजन करण्यात यावे’’, अशी अपेक्षा व्यक्त केली. दिपक देशपांडे (नागपूर) यांनी, पत्रकार सन्मान योजनेच्या पात्रतेसाठी तीस वर्षापूर्वींची मागितली जाणारी कागदपत्रे देणे पत्रकारांसाठी कठीण जात असल्याचे सांगितले. बापुराव जगताप (फलटण) यांनी, वृत्तपत्रांच्या पडताळणीतील जीएसटीच्या बिलांची अट जाचक असल्याचे सांगून ही अट रद्द करण्यासाठी राज्यातील सर्व संपादकांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. लिंबराज बिडवे (औरंगाबाद) यांनी, ‘‘राज्यात ज्याप्रमाणे पोलीस कल्याण निधी उभारणीसाठी वेगवेगळे प्रयोग राबवले जातात त्याप्रमाणे संपादक व पत्रकार कल्याण निधी उभारणीसाठी प्रयत्न व्हावेत’’, अशी अपेक्षा व्यक्त केली.

सभेदरम्यान, पत्रकारांना वैद्यकीय मदत, सन्मान योजनेचा लाभ, संदेश प्रसारण धोरणाची काटेकोर अंमलबजावणी या प्रश्‍नावर शासनाचे लक्ष वेधण्याचा व प्रसंगी आंदोलनाचा मार्ग स्विकारण्याचा  एकमुखी ठराव संमत करण्यात आला. प्रारंभी सभेचे सूत्रसंचालन, विषयपत्रिकेचे वाचन व संस्थेचा कार्य आढावा कार्यलक्षी संचालक अमर शेंडे यांनी सादर केला.
सभेस बाळकृष्ण वाणी (जळगाव), सुनिल कुलकर्णी (अहमदनगर), बबनराव सोनवणे (औरंगाबाद), प्रमोद वाणी (जळगाव), विशाल शहा, रोहित वाकडे, प्रसन्न रुद्रभटे (फलटण), ईश्‍वरचंद्र गुप्ता (आंबेजोगाई) आदी सभासद उपस्थित होते.–रायगड चा युवक

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!