Saturday, November 27, 2021

मुरकुटे यांच्या नाकर्तेपणामुळे नेवासा मतदार संघातील जागा भाजपाने गमावली

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपचे नगरसेवक रणजित सोनवणे व दिनेश व्यवहारे यांना जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या आदेशावरून पक्षातून निलंबन करण्यात आले. त्यानंतर सोनवणे व व्यवहारे यांनी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अन्यथा पक्ष तालुक्यातून हद्दपार होईल, असा इशारा प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिला आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठविलेल्या पत्रात या नगरसेवकांनी म्हटले आहे की, आम्ही अनेक वर्षांपासून भाजपचे काम करत आहोत. 2014 च्या निवडणुकीत ऐनवेळी पक्षात आलेल्या मुरकुटे यांना निवडून आण्यासाठी जिवाचे रान केले.

नेवासे नगरपंचायतच्या निवडणुकीतही शर्थीचे प्रयत्न करून भाजपची सत्ता आणली. मात्र स्वार्थासाठी भाजपात आलेल्या मुरकुटे यांच्या पत्नी भेंडे गटातून काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्य होत्या. मुरकुटे यांनी त्यांच्या काँग्रेसच्या सदस्यपदाचा राजीनामा घेण्याचे धाडस दाखवले नाही. स्वतःच्या पत्नीलाही भाजपमध्ये अधिकृतरित्या ते आणू शकले नाहीत.

पक्षात त्यांनी नेहमी भाजप विरोधी पक्षासोबत व्यक्तिगत तडजोडी करत पक्षहिताला हरताळ फासला. स्वतःच्या कुटुंबाचा व नातेवाईकांचा आर्थिक फायदा करून घेतला, असे सोनवणे यांनी म्हटले आहे.व्यवहारे यांनी, मुरकुटे यांच्या नाकर्तेपणामुळे नेवासा मतदार संघातील जागा भाजपला गमवावी लागली.

मात्र निवडणुकीनंतर काही काळातच तालुक्यात पक्ष प्रायव्हेट कंपनी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ज्या व्यक्तीचे पक्ष वाढीसाठी कुठलेही योगदान नाही, त्यास तालुकाध्यक्ष करून स्वतःच्या हातचे बाहुले केले आहे. पक्षविरोधी काम केले नसतानाही दुसरा माणूस नेतृत्व करू नये, या भावनेतून माझे निलंबन करण्यात

आले असून ही बाब पक्षहिताला बाधा आणणारी आहे. पक्षविरोधी कारवाई करणार्‍या मुरकुटे यांची भाजपतून त्वरित हकालपट्टी करण्यात यावी, अन्यथा जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत निवडणुकीतून भाजप हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही.

पक्षश्रेष्ठींनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना योग्य न्याय देण्याची मागणी पत्रकात करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!