Friday, December 3, 2021

पत्रकार संदीप नवले यांना राज्यपालांच्या हस्ते कृषी पत्रकारिता पुरस्कार प्रदान

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

तालुक्यातील भेंडा येथील कृषी पत्रकार संदीप नवले यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे हस्ते कृषी पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला.

देशातील युवकांमध्ये देशभक्तीची भावना जागवणे तसेच शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती गावागावांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने सुरु केलेली नेहरू युवा केंद्रे देशात तसेच राज्यात चांगले कार्य करीत असून कोरोना काळात राज्यातील नेहरू युवा केंद्रांनी अतिशय चांगले काम केले आहे. केंद्रांनी ग्रामीण तसेच आदिवासी भागांच्या उन्नतीसाठी कार्य करावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

सोमवार दि.27 सप्टेंबर रोजी मुंबईतील राजभवन येथे नेहरू युवा केंद्रांच्या महाराष्ट्र व गोवा शाखेच्या वतीने देण्यात येणारे राज्यस्तरीय युवा उत्कृष्ट संस्था, मंडळ पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

राज्यपालांच्या हस्ते गायन व संगीत क्षेत्रातील सेवेबद्दल गायिका सुनाली राठोड व गायक रुपकुमार राठोड यांना सन्मानित करण्यात आले. ग्रामीण तंत्रज्ञान संस्था, सुंदरबन, न्हावरे, ता. शिरूर, जिल्हा पुणे या संस्थेला युवा शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वावलंबन कार्यासाठी उत्कृष्ट संस्था पुरस्कार व एक लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष गीताराम कदम यांनी पुरस्कार स्वीकारला.कार्यक्रमाला नेहरू युवा केंद्र संघटनेचे महाराष्ट्र राज्य संचालक प्रकाश कुमार मनुरे, उपसंचालक यशवंत मानखेडकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी डॉ.अरविन्द शाळीग्राम, मुख्य कार्यकारी अधिकारी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, काकासाहेब चंद्रकांत मोहिते, प्राचार्य, रसिका कुलकर्णी, शरद आनंदराव पाबळे, (पत्रकारिता), सुभाष दळवी, विशेष कार्यकारी अधिकारी, मुंबई महानगरपालिका,  संदीप नवले, (पत्रकारिता), श्रद्धा दळवी, सामाजिक कार्यकर्ता, पृथ्वी बाळासाहेब इंगोले-राक्षे, सुज्ञान मानखेडकर, राज सुनिल रनधिर, आम्रपाली चव्हाण,  सागर हेमाडे, विकास कतरे यांचा सत्कार करण्यात आला.

 

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!