Tuesday, November 30, 2021

नगर ब्रेकींग: जिल्ह्यातील या बड्या नेत्यांवर जीवघेणा हल्ला

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे माजी संचालक व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे यांच्यावर घारगाव (ता. श्रीगोंदे) येथे जीवघेणा हल्ला झाला.या हल्ल्यात पानसरे यांच्यासह दोघे यात जखमी झाले असून त्यांच्यावर नगर येथे उपचार चालू आहेत.

दरम्यान या मारामारीत पानसरे पती,पत्नीविरुद्धही समोरच्या व्यक्तींनी गुन्हा दाखल केला आहे.बेलवंडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घारगाव येथे रस्त्याच्या वादातून पानसरे व परदेशी या दोन्ही कुटुंबात वाद सुरू होते.या वादाचे रुपांतर रविवारी तुफान मारामारी झाले.

यात परदेशी कुटुंबाने रिवाल्वर, तलवार, कोयता, लोखंडी गज, दगड, मिरचीपूड या हत्यारांचा वापर करून आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप दत्तात्रय पानसरे यांनी फिर्यादीत केला आहे.यात त्यांच्यासोबत महेश पानसरे हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी रमेश परदेशी, शिवाजी परदेशी, नारायण परदेशी, शुभम परदेशी,

योगेश परदेशी, नामदेव परदेशी, विठ्ठल परदेशी, भगवान परदेशी, हरी परदेशी, जनाबाई परदेशी, वंदना परदेशी, लता परदेशी, गीता परदेशी, साधना परदेशी, परदेशी परदेशी, श्रेया परदेशी, सर्व राहणार घारगाव ता.श्रीगोंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान याच मारामारी दत्तात्रय पानसरे व त्यांच्या पत्नी पंचायत समितीच्या माजी सभापती अर्चना पानसरे, महेश पानसरे सुनील पानसरे किसन पानसरे राधाबाई पानसरे यांनी गजाच्या साहाय्याने आपल्यावर हल्ला करुन जखमी केल्याची फिर्याद शुभम परदेशी यांनीही बेलवंडी पोलिसात दाखल केलेली आहे याप्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!