Saturday, November 27, 2021

पुन्हा महागलं पेट्रोल-डिझेल; जाणून घ्या आजचा 1 लीटर पेट्रोल दर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आज 28 सप्टेंबर मंगळवारी पेट्रोल-डिझेल दरात वाढ झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी जवळपास 22 दिवसांनंतर आज पेट्रोल दरात वाढ केली आहे. तर सलग चौथ्या दिवशी डिझेलच्या किंमतीही वाढल्या आहेत.देशभरात मागील 4 दिवसांत डिझेल दरात 4 वेळा वाढ झाली आहे. या चार दिवसांत

डिझेल दरात 95 पैसे प्रति लीटरने वाढ झाली आहे. भारतीय तेल कंपन्यांनी नुकतंच 24 सप्टेंबर रोजी 20 पैसे, तर 26 सप्टेंबरला 25 पैसे वाढ केली होती. 27 सप्टेंबरला पुन्हा 25 पैशांची वाढ झाली. त्यानंतर आज सलग तिसऱ्या दिवशी आज पुन्हा 25 पैशांची वाढ करण्यात आली.

पेट्रोल दर मागील 22 दिवसांपासून स्थिर होता, परंतु आज पेट्रोल दरात पुन्हा वाढ झाली आहे.आज राजधानी दिल्लीत पेट्रोल दर 20 पैशांनी वाढवण्यात आलं आहे. तर डिझेल 25 पैशांनी महागलं आहे. मुंबईत पेट्रोल दरात आज 21 पैशांची वाढ झाली आहे.इंडियन ऑयल कॉर्पोरेशननुसार (IOCL), या वाढत्या

किंमतीनंतर दिल्लीत पेट्रोल 101.39 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 89.57 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत पेट्रोल भाव 107.47 रुपये प्रति लीटरवर पोहोचला आहे.देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. तसंच मोबाइल

फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल.

प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!