Saturday, November 27, 2021

नगर ब्रेकींग: जिल्ह्यात आज वाढले इतके रूगण;जाणून घ्या तुमच्या तालुक्यातील आकडेवारी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यात मंगळवारी एकुण 494 कोरोना बाधित आढळले आहेत. दोन दिवसापासून अहमदनगर जिल्ह्यातील एकुण आकडेवारीत घट होत आहे. घटत्या आकड्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आज आढळलेल्या बाधितांमध्ये संगमनेर तालुका टॉपवरच आहे. मात्र सोमवारच्या तुलनेत एकुण आकडेवारीसह तालुकानिहाय आकडेवारीत घट झाली आहे. मात्र अकोले, राहाता व शेवगाव तालुक्याच्या आकडेवारीत सोमवारच्या तुलनेत वाढ झाली आहे.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये राहुरी, जामखेड तालुके एक अंकी असून भिंगार, मिलटरी हॉस्पिटलची आकडेवारी शुन्यावर आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची आकडेवारी घटत चालल्याने समाधान व्यक्त होत आहे.

आज मंगळवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 67, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 229 तर अँटीजेन चाचणीत 198 असे 494 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 102, अकोले 53, पारनेर 52, राहाता 51, नगर ग्रामीण 39, नेवासा 30, शेवगाव 28, श्रीगोंदा 25, नगर शहर 24, कर्जत 23, पाथर्डी 18, कोपरगाव 15, श्रीरामपूर 13, इतर जिल्हा 11, राहुरी 07, जामखेड 03 असे कोरोना बाधित आढळून आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!