Wednesday, December 8, 2021

नगर जिल्हयासाठी ऑरेंज अलर्ट जारी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील नागरीकांना कळविणेत येते की, भारतीय हवामान विभागामार्फत अहमदनगर जिल्हयात दि.28/09/2021 ते दि.29/09/2021 या कालावधीत वीजेचा कडकडाट व वादळी वा-यासह अतिवृष्टीची शक्यता वर्तवीलेली आहे व जिल्हयासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे.

दि.28/09/2021 रोजी दुपारी 12.00 वा. अहमदनगर जिल्हयातून वाहणा-या गोदावरी नदीस नाशिक जिल्हयातील नांदुरमधमेश्वर बंधा-यातून 7,924 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे व भिमा नदीस पुणे जिल्हयातील विविध धरणांच्या विसर्गामुळे दौंड पुल येथे 3,705 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तसेच जिल्हयातील भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असुन

प्रवरा नदीपात्रात 816 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे व पुढे निळवंडे धरणातून प्रवरा नदी पात्रात 1,144 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे तर ओझर बंधा-यातून प्रवरा नदीपात्रात 70 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

मुळा धरणातून मुळा नदीपात्रात सदयस्थितीत 1,085 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर सिना धरणातून सिना नदीपात्रात 56 क्युसेस व खैरी धरणातून 1,051 क्युसेस विसर्ग सुरू आहे. जिल्हयातील पर्जन्यमानामुळे वा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यास धरणाच्या पाणीसाठयात वाढ होऊन

पर्यायाने नदीपात्रातील विसर्गात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हयातील नदीकाठच्या गावातील नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे जिल्हयातील तमाम नागरिकांना आवाहन करण्यात येते कि, स्थानिक प्रशासनाव्दारे

दिलेल्या सुचनांचे पालन करावे. सखल भागात राहणा-या नागरीकांना तातडीने सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावेत. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्र तसेच ओढे व नाले यापासुन दुर रहावे व सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा ओढे

नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करु नये.जुनाट/मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये. धोकादायक झालेले तलावांचे क्षेत्रामध्ये राहण्या-या नागरिकांचे तातडीने सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते.

त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहण्या-या लोकांनी दक्षता घ्यावी वेळीच सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरु नये. अचानक नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यास

जिवीतास धोका उदभवू शकतो. धोकादायक ठिकाणी चढू अथवा उतरु नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी (Selfie) काढू नये. मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्षीत ठिकाणी आश्रय घ्यावा.विदयुतवाहीनी अथवा ट्रान्सफॉर्मरजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या विदयुत तारा, विदयुत खांबापासून दूर रहावे.

आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दुरध्वनी क्र.1077 (टोल फ्री), 0241-2323844 वा 2356940 वर संपर्क साधावा.

ताज्या बातम्या

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांना हे देणार बांगड्यांचा आहेर ?

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संपदा पतसंस्थेच्या ठेवीदारांचे 2010 पासून 32 कोटी रुपये, बनावट सोनेतारणचे 6 कोटी रुपये तसेच शासनाच्या वर्ग-2 जमिनीवरती नऊ कोटी रुपये...
error: Content is protected !!