Friday, December 3, 2021

पुन्हा मिळू शकेल गॅससिलेंडरवरील सब्सिडी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: एलपीजी सब्सिडीबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. घरगुती वापराच्या पेट्रोलियम गॅसवर पुन्हा सबसिडी देण्याचा विचार पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय करत आहे. ग्राहकांना किती सबसिडी देता येईल, त्यासाठी मूल्यांकन सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

मंत्रालयातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार ‘बिझनेस स्टँडर्ड’ने याबाबत वृत्त दिलं आहे.
कोणत्या किमतीत जास्तीत जास्त ग्राहकांना एलपीजी गॅस सिलिंडर परवडेल याचा अंदाज घेण्यासाठी सध्या एक सर्वेक्षण केलं जात असल्याची माहिती या प्रकरणाशी संबंधिक असलेल्या

एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यानं दिली आहे. सब्सिडी देण्यासाठी विविध पर्यायांचा विचार केला जात आहे. फक्त प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतल्या लाभार्थ्यांनाच सबसिडी वितरित करणं, हा एक पर्याय असल्याचंदेखील या अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.

वर्षभराचा विचार केला, तर पेट्रोलियम उत्पादनांवर दिल्या जाणाऱ्या अनुदानात एप्रिल ते जुलै या कालावधीत 92 टक्के घट झाल्याचं दिसून आलं आहे. स्वयंपाकाच्या इंधनाच्या किमतीत प्रचंड वाढ होऊनही सरकारनं लाखो लाभार्थ्यांच्या खात्यावर एलपीजी सिलेंडरवरचं अनुदान देणं बंद केलं आहे. 2021-22 च्या पहिल्या

4 महिन्यांत पेट्रोलियम उत्पादनांवर 1233 कोटी रुपये अनुदान असेल अंदाज होता. 2020-21मध्ये पहिल्या चार महिन्यांत ही रक्कम 16 हजार 461 कोटी रुपये होती. म्हणजेच सध्या सब्सिडीच्या रकमेत कपात करण्यात आली आहे.

सरकारने मे 2020 मध्ये काही ठिकाणी एलपीजीवरची सब्सिडी रद्द केली होती. त्या वेळी दिल्लीत 14.2 किलो वजनाच्या एलपीजी सिलिंडरची किंमत 581 रुपये 50 पैसे होती. सध्या ही किंमत 884 रुपये 50 पैशांवर गेली आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!