Saturday, November 27, 2021

महाराष्ट्र पुन्हा हादरला:ब्यूटी पार्लर चालक महिलेवर बलात्कार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:ब्यूटी पार्लर चालक महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक नाशिकमध्ये समोर आल आहे. पार्लरमध्ये पूजा करत असताना दुकानात शिरुन आरोपीने महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. सराईत गुन्हेगाराने चाकूचा धाक दाखवून व्यावसायिक महिलेवर बलात्कार केला.

नाशिकमध्ये पवननगर भागात एका व्यावसायिक महिलेवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सराईत गुन्हेगाराने चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केले. या भागात पीडित महिलेचं ब्यूटी पार्लर आहे. आपल्या पार्लरमध्ये

पूजा करत असताना संशयित आरोपी दुकानात घुसला. त्यानंतर आतून दरवाजा लावून आरोपीने तिला चाकूचा धाक दाखवला. महिलेच्या तोंडात बोळा कोंबून, तिचे हात बांधून तिच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप आहे.

खुनाच्या गुन्ह्यात जेलमधून पॅरोलवर
हिंमत करुन महिलेने अंबड पोलिसात तक्रार दाखल केली. खुनाच्या गुन्ह्यात जेलमधून पॅरोलवर सुटल्यानंतर संशयित फरार झाला होता. त्याचा शोध सुरु असतानाच त्याने बलात्काराचा गुन्हा केला . फरार संशयिताचा शोध सुरु आहे.
पोलीस आयुक्त अॅक्शन मोडमध्ये

दरम्यान, नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे अंबड पोलीस ठाण्यात दाखल झाले असून आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची चार पथकं रवाना झाली आहेत.दरम्यान दुसरीकडे, 24 वर्षीय युवतीचे लैंगिक शोषण करुन ती गरोदर राहिल्यानंतर तिला गर्भपात करण्यास भाग पाडल्या प्रकरणी नागपूर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.

ही घटना उत्तर नागपुरातील यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. यूट्यूबवर व्हिडीओ पाहून बलात्कार पीडितेने आपल्या घरीच स्वत:चा गर्भपात केल्यानंतर ही बाब उघडकीस आली.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!