Saturday, November 27, 2021

आता या फोनमध्ये Gmail व YouTube चालणार नाही

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:स्मार्ट फोनमध्ये Google Maps, Gmail आणि YouTube आजकाल जवळजवळ प्रत्येक युजर वापरतात. याची युजर्सना इतकी सवय लागली आहे की, ते मोठ्या प्रमाणात या सर्व अ‍ॅप्सवर अवलंबून असतात. अशा परिस्थितीत, जर हे

अ‍ॅप्स अचानक काम करणे थांबवले, तर काय होईल याचा विचार करा. लोक आता हे अ‍ॅप्स फोनमध्ये नाही अशी कल्पना ही करु शकत नाही. परंतु काही फोनमध्ये हे बंद होणार आहे.जुने अँड्रॉइड वर्जनवरील फोनमध्ये लाखो युजर्स Google Maps, Gmail आणि YouTube वापरत आहेत. परंतु आता ते बंद केले जाणार आहे.

ज्यामुळे आता युजर्स या अ‍ॅप्सना आपल्या फोनमध्ये साइन-इन करु शकणार नाही.जे युजर्स अद्याप Android 2.3 डिव्हाइसवर Google खाते वापरत आहेत त्यांना या यादीतुन काढले जाईल. गुगलची ही जुनी आवृत्ती डिसेंबर 2010 मध्ये लाँच झाली. परंतु आता काही टेकनीकल गोष्टींमुळे कंपनी जुन्या अँड्रॉइड सिस्टीमसाठी सपोर्ट बंद करत आहे.

Google कडून असे म्हटले गेले आहे की, ते या व्यासपीठासाठी समर्थन मागे घेत आहे. युजर्सना सुरक्षित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीचे मत आहे. नवीन नियम 27 सप्टेंबरपासून लागू होईल. म्हणजेच, 27 सप्टेंबरनंतर तुम्ही जुन्या अ‍ॅन्ड्रॉइड, ओएसवर आधारित स्मार्टफोनमध्ये हे अ‍ॅप्स वापरू शकणार नाही.

बंद होणाऱ्या अ‍ॅप्समध्ये YouTube, Google Play Store, Google Maps, Gmail, Google Calendar सारख्या अनेक अ‍ॅप्सचा समावेश आहे.  Google अनेकदा अँड्रॉइडच्या जुन्या सॉफ्टवेअरच्या आवृत्त्या काढून टाकते आणि त्याच्या जागी नवीन आवृत्त्या लाँच करत आहे.जर त्यांचे डिव्हाइस

सपोर्ट देत नसेल तर, गूगलने वापरकर्त्यांना त्यांचे फोन अँड्रॉईड 3.0 किंवा नंतरचे फोन अपडेट करण्यास सांगितले आहे

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!