Friday, December 3, 2021

प्रसिद्ध गायिका ज्योती गोराणे यांचे अभिनय क्षेत्रात पदार्पण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

तालुक्यातील खरवंडी येथील माहेर असलेल्या प्रसिद्ध गायिका ज्योती गोराणे यांनी आता अभिनय क्षेत्रात पदार्पण केले असुन मायबोली मराठी चॅनेलवर ३० सप्टेंबर पासून सुरु होत असलेल्या ‘माझा ज्ञानोबा’ मालिकेत त्यांनी भुमिका केली आहे.या मालिका विषयी नेवासा तालुक्यात उत्सुकता लागली आहे.

श्री क्षेत्र आळंदी( पुणे )तील आर्विक प्राॅडक्शनचे प्रशांत पवार निर्मित व ह.भ.प. जलाल महाराज लिखीत कार्यकारी निर्माता सुमीत पवार तसेच प्रमोद श्रीवास्तव दिग्दर्शित संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारीत “माझा ज्ञानोबा” ही सांप्रदायिक मालिका गुरुवार दि. ३० सप्टेंबर पासुन रात्री ९ ते ९.३० या वेळेत प्रसारित होणार आहे. या मालिकेत महाराष्ट्रातील प्रसिध्द गायिका सौ.ज्योती शाम गोराणे यांचे ‘माझा ज्ञानोबा’ मालिकेच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण होत आहे.

गोराणे यांनी आजपर्यंत गायन क्षेत्रात वारकरी भजन, निवेदन अशा अनेक क्षेत्रामध्ये एक विशिष्ट उंची गाठली आहे.’स्वर ज्योतिर्मय शाम’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात स्वतःची एक स्वतंत्र शैली निर्माण करुन आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे.अनेक चॅनल्सवरील आध्यात्मिक मालिकांना त्यांचे पती शाम गोराणे यांचे संगीत आहे. तेरा वर्षिय मुलगा सोहम गोराणे हा जगप्रसिद्ध तबलावादक आहे. पुढील महिन्यात नेवासा येथील ज्ञानेश्वर मंदीरात मालिकेचे प्रमोशन कार्यक्रम होणार आहे. माझा ज्ञानोबा ही मालिका सर्वांनी पहावी असे आवाहन ज्योती गोराणे यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!