Monday, November 29, 2021

नगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी:वादळ, विजा व पुराचाही धोका

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: मराठवाड्यापर्यंत येऊन पोहचलेला वादळी पाऊस लवकरच अहमदनगर जिल्ह्यात पोहचण्याची शक्यता आहे. पावसासोबत वादळ आणि विजांचीही धोका आहे. मुख्य म्हणजे सर्व प्रमुख धरणे भरलेली असल्याने पावसाचे पाणी थेट नदीत सोडले जाणार असल्याचे पुराचाही धोका आहे, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. अपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरावरील गुलाब चक्री वादळाचा परिणाम म्हणून राज्यातील अनेक भागात वादळ आणि अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यानुसार वादळाची वाटचाल सुरू आहे. मराठवाड्यात पावसानाने हाहाकार माजविला आहे. शेजारील बीड जिल्ह्यापर्यंत पाऊस सुरू आहे.

 लवकरच अहमदनगर जिल्ह्यात पाऊस आणि वादळ येऊन ठेपणार असल्याचा अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधकारी संदीप निशित यांनी नागरिकांना सावधनतेचा इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की, हवामान विभागाने नगर जिल्ह्यात २८ आणि २९ सप्टेंबर रोजी विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीची शक्यता वर्तविलेली आहे.

अहमदनगर जिल्हयासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. या अंदाजानुसार पाऊस आल्यास नागरिकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे.जिल्ह्यातील धरणेे भरलेली असलेल्या नदी पात्रात पाणी सोडले जात आहे. अंदाजानुसार पाऊस झाला तर नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन पूर येण्याची शक्यता आहे.

नगर जिल्हयातून वाहणा-या गोदावरी नदीला नाशिक जिल्हयातील नांदुरमधमेश्वर बंधा-यातून सुमारे आठ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. भिमा नदीला पुणे जिल्हयातील विविध धरणांच्या विसर्गामुळे दौंड पुल येथे सुमारे चार हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जिल्हयातील भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे.

प्रवरा नदीपात्रात ८१६ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. निळवंडे धरणातून प्रवरा नदी पात्रात एक हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर ओझर बंधाऱ्यातून प्रवरा नदीपात्रात पाणी वाहत आहे. मुळा धरणातून मुळा नदीपात्रात सदयस्थितीत एक हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सीना आणि खैरी धरणातून

सीना नदीपात्रात पाणी सोडले जात आहे. अशा परिस्थितीत पाणसोट क्षेत्रात पाऊस झाल्यास धरणाच्या पाणीसाठयात वाढ होऊन पर्यायाने नदीपात्रातील विसर्गात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी दक्ष राहावे, असे आवाहन निशित यांनी केले आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे देण्यात आलेल्या सुचनांचे पालन करावे. सखल भागात राहणा-या नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्यात येणार आहे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्र तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे. ओढे नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये.

पूर पाहण्यासाठी गर्दी करु नये.जुनाट, मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये. धोकादायक झालेले तलावांचे क्षेत्रामध्ये राहण्या-या नागरिकांचे तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, अशा प्रकारची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!