Saturday, November 27, 2021

नगर जिल्ह्यातील हे धरणही भरले

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना धरण ओव्हरफ्लो झाले आहे. कर्जत, आष्टी, श्रीगोंदा, जामखेड या भागाला वरदान ठरलेले कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना धरण सप्टेंबर

महिन्याच्या अखेरला आज दि. 28 रोजी सकाळी 6 वाजता 100 टक्के भरल्याने लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांमधून समाधान व्यक्त होत आहे.सीना धरणाची पाणी साठवण क्षमता 2400 द.ल.घ.फू. असुन मृतसाठा 552 द.ल.घ.फू. तर गाळ 185 दलघफू व उपयुक्त साठा 1847.33 आहे. तर एकूण साठा टक्केवारी 100 आजचा

पाऊस 200 (मी.मी.) एकूण पाऊस 550 (मी.मी) आजची आवक 88.61 द.ल.घ.फू. एकूण आवक 1644.32 द.ल.घ.फू असुन उजव्या कालव्याद्वारे 51.61 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.धरण पाणलोट क्षेत्रातून सांडव्यावरुन 56 क्युसेसने पाण्याचा विसर्ग होत असल्याची माहिती,

सीना धरण मध्यम प्रकल्प उपविभागीय अभियंता बबनराव वाळके यांनी दिली.मागील काही दिवसांत धरण पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने धरण पाणलोट क्षेत्रात नवीन पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली होती. पाणलोट क्षेत्रात सातत्याने पडत असलेल्या दमदार पावसामुळे धरण

ओव्हरफ्लो झाले आहे. नवीन पाण्याची आवक होत असल्याने सांडव्यावरून सीना नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असुन सीना नदी वाहती झाली आहे.सीना धरण ओव्हरफ्लो झाल्याने येथील पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न सुटला आहे. धरण पाणलोट मध्ये कर्जत तालुक्यातील

सात हजार सहाशे बहात्तर हेक्टर तर बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सातशे त्र्याहत्तर हेक्टर जमीन उजव्या व डाव्या कालव्याद्वारे ओलिताखाली येत आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!