Friday, December 3, 2021

नगरचे पालकमंत्री मुश्रीफांनी आणखी एक १५०० कोटींचा घोटाळा केला ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: किरीट सोमय्या विरुद्ध हसन मुश्रीफ यांच्यातील वादाचा पुढचा अंक आज कोल्हापुरात पहायला मिळाला. सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचा तिसरा आरोप केलाय. मंत्री मुश्रीफ यांनी राज्यातील ग्रामपंचायतींकडून जीएसटी, टीडीएस, यासह इतर करांचा भरणा

करण्यासाठी घाईगडबडीत निविदा काढून आपले जावई मतीन मंगोली यांच्या कंपनीला ठेका दिला. या कामात पंधराशे कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.दरम्यान, संताजी घोरपडे साखर कारखाना आणि आप्पासाहेब नलवडे साखर कारखान्यातील

भ्रष्टाचारासंदर्भात मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, याबाबत तक्रार अर्ज त्यांनी मुरगूड पोलिस ठाण्यात दिलाय. शिवाय मंत्री मुश्रीफ यांचा चौथा घोटाळा लवकरच बाहेर काढू, असा इशाराही त्यांनी दिलाय.राज्यातील ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांकडील

जीएसटी, टीडीएस, यासह इतर करांचा भरण्यासाठी 18 जानेवारी 2019 रोजी निविदा काढली होती त्यांनी त्याला केवळ सात दिवसांची मुदत देण्यात आली घाईगडबडीत निविदा काढून त्यांनी त्यांचे जावई मतीन मंगोली यांच्याशी संबंधित असलेल्या जयोस्तुते मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला ठेका दिला

या कंपनीने पंधराशे कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय.जयोस्तुते मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आठ वर्षांपूर्वी स्थापन झाली मात्र 2020 पर्यंत त्या कंपनीचे कोणतेही व्यवहार झाले नाहीत विद्यार्थ्यांची वस्तीग्रह सुरू करण्याचा उद्देश असलेल्या कंपनीला मुश्रीफांनी कर गोळा करण्याचे

काम दिले टेंडर मिळण्यापूर्वी या कंपनीचे नाव यश हॉस्टेल प्रायव्हेट लिमिटेड असे होते होस्टेल चालवणार्‍या कंपनीला कोणताही अनुभव नसताना करभरणा करण्याचा टेंडर कसा दिला असा सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.पंधराशे कोटीचे टेंडर दिलेल्या कंपनीचे संचालक अतुल रासकर पुण्यात एका चाळीत राहतात.

मुश्रीफ यांचे जावई मतीन मंगोली आणि पुण्यातील एजंट चंद्रकांत गायकवाड यांनी हव्या अशा अटी व शर्ती टाकून टेंडर मंजूर करून घेतले. यासाठी मुश्रीफ यांचे तत्कालीन ग्राम विकास सचिव अरविंद कुमार आणि विद्यमान ग्राम विकास सचिव राजेश कुमार यांनी मदत केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

या घोटाळ्याचे पुरावे ईडी, नीती, सहकार विभाग आणि अर्थ मंत्रालयाकडं देणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. दरम्यान, मुश्रीफ यांच्या घोटाळ्यावरून किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. तसेच आणखी दोन मंत्र्यांचे घोटाळे लवकरच बाहेर काढणार असल्याचं सांगितलं.

यातील एक मंत्री विदर्भातील तसेच विदर्भातील असल्याचेही त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!