Friday, December 3, 2021

पत्नीशी जबरदस्तीने अनैसर्गिक सेक्स गंभीर गुन्हा:न्यायालय

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पत्नीशी जबरदस्तीने अनैसर्गिक पद्धतीने लैंगिक संबंध ठेवण्याच्या एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचे मत नोंदवले आहे. सोमवारी देशातील सर्वौच्च न्यायालयाने म्हटले की पतीने पत्नी जबरदस्तीने अनैसर्गिक पद्धतीने लैंगिक संबंध ठेवणे हा एक गंभीर गुन्हा आहे. विशेषत: जेव्हा अशा

प्रकारामुळे पत्नीने आत्महत्या केली असल्यास तर याचे स्वरुप अत्यंत गंभीर होते. सर्वोच्च न्यायालयाने आपले मत नोंदवताना आरोपीला जामिन देण्यास नकार दिला. हा आरोपी हुंड्यासाठीचा छळ, घरगुती हिंसा आणि बलात्कार यासारख्या आरोपांमध्ये दोन वर्षांपासून अधिक काळासाठी कैदेत आहे.

२०१९ मध्ये हरियाणातील भिवानी जिल्ह्यातील पीडिताच्या भावाने आयपीसीच्या कलम १४८, १४९, ३२३, ३७७ आणि ३०६ अंतर्गत पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती.मुख्य न्यायामुर्ती एनव्ही रमण्णा आणि न्यायमुर्ती सुर्यकांत आणि न्यायमुर्ती हिमा कोहलीच्या खंडपीठाने पीडिताच्या पतीला म्हणजे प्रदीपला जामिन देण्यास नकार दिला.

प्रदीपने त्याच्या सासरच्या मंडळींकडून हुंड्याची मागणी केली होती आणि ती पूर्ण न झाल्याने पत्नीवर जबरदस्तीने अनैसर्गिक पद्धतीने सेक्स केला होता. मुख्य न्यायमुर्तींच्या खंडपीठाने म्हटले की कलम ३७७ अंतर्गत बलात्कार हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. आरोपी पतीची चौकशी सुरू असताना त्याच्यावर

कोणतीही दया दाखवण्यास तो पात्र नाही. खंडपीठाने म्हटले की आम्हाला माहित नाही की पोलिस काय करत आहेत. तू हुंडा मागण्यास सुरूवात केली. जेव्हा महिलेच्या माहेरची मंडळी मागणी पूर्ण करू शकली नाही तेव्हा आरोपीने पत्नीवर अत्याचार करण्यास सुरूवात केली. तिचे खासगी फोटो आणि व्हिडोओ सोशल मीडियावर शेअर केले.

पत्नीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सर्वात महत्त्वाचे आणि गंभीर बाब म्हणजे आरोपीने पत्नीशी जबरदस्तीने अनैसर्गिक पद्धतीने सेक्स केला. या सर्व अत्याचाराला कंटाळून महिलेने आत्महत्या केली. अशा परिस्थितीत आरोपी कोणत्याही दयेस पात्र नाही. हा एक अत्यंत गंभीर गुन्हा आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!