Friday, December 3, 2021

धक्कादायक:महाराष्ट्रात आज मृतांच्या संख्येत वाढ

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात कालच्या तुलनेत आज करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत नगण्य वाढ झाली असली, तरी आज करोना बाधित मृतांच्या सख्येत वाढ झाल्याने स्थिती चिंताजनक आहे. तर कालच्या तुलनेत आज बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून कालच्या तुलनेत एकूण सक्रिय रुग्णांची

संख्या देखील घटल्याने राज्याला हा दिलासा मिळाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात २ हजार ८४४ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या २ हजार ४३२ इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण ३ हजार ०२९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

काल ही संख्या २ हजार ८९५ इतकी होती. तर, आज ६० रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या ३२ इतकी होती.आज राज्यात झालेल्या ६० रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवरच स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ६५ हजार २७७ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२६ टक्के इतके झाले आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ८४ लाख २९ हजार ८०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ४४ हजार ६०६ (११.२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ५४ हजार ९८५ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, १ हजार ५१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३६ हजार ७९४ इतकी आहे. काल ही संख्या ३७ हजार ०३६ इतकी होती. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा ९ हजार २६३ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात ही संख्या ६ हजार ००१ आहे.

अहमदनगरमध्ये ही संख्या ५ हजार ५३१ अशी वाढली आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या २ हजार ०७७ वर आहे. तर, सांगलीत एकूण १ हजार २७२ आहे. तसेच, सोलापुरात ही संख्या १ हजार ५७६ इतकी आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!