Friday, December 3, 2021

धक्कादायक प्रकार:कोरोना लस देण्याऐवजी दिला हा डोस

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:ठाणे महानगरपालिकेच्या डाॅक्टर आणि नर्सने चक्क एका ठाणेकराला कोरोना ऐवजी रेबीजची लस दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  या प्रकरणी डॉक्टर आणि परिचारिकेला निलंबित करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कळव्यातील आतकोनेश्वर नगर भागात कोरोना लसीकरण सुरू असताना हा प्रकार घडला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर तातडीने चौकशी करुन आज दुपारी महापौर नरेश म्हस्के यांनी पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार पालिकेच्यावतीने येथील डॉ. राखी तावडे आणि परिचारिका किर्ती पोपरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.पात्र नसतानाही सेलिब्रिटींना लस देण्याचा प्रकार ही ठाणे महानगरपालिकेतच घडला होता. या घटना ताज्या असतांनाच कोविड ऐवजी रेबीजची लस देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने सर्वानाच धक्का बसला आहे.

या प्रकरणानंतर  महापौर नरेश म्हस्के यांनी तातडीने बैठक घेऊन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांची कानउघाडणी केली. ‘वारंवार घडणाऱ्या अशा प्रकारांमुळे पालिकेची नाहक बदनामी होत आहे. हे असंच सुरू राहिले तर आरोग्य विभागात मोठे फेरबदल करावे लागतील, असा इशाराही महापौर नरेश म्हस्के यांनी दिला.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!