Friday, December 3, 2021

या योजनेत 420 रुपये भरा मिळवा दरमहा 10000 रुपये

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:जर तुम्ही सुरक्षित ठिकाणी कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही सरकारच्या अटल पेन्शन योजनेत पैसे गुंतवू शकता. अटल पेन्शन योजना 2015 मध्ये असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी सुरू करण्यात आली होती,

परंतु या योजनेमध्ये 18 ते 40 वर्षे वयाचा कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो आणि पेन्शनचा लाभ घेऊ शकतो. त्यासाठी आपले बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते असायला हवे. या योजनेमध्ये ठेवीदारांना 60 वर्षांनंतर पेन्शन मिळू लागते.

तुम्ही अटल पेन्शन योजनेत केलेली गुंतवणूक तुमच्या वयावर अवलंबून आहे. या योजनेंतर्गत किमान मासिक पेन्शन 1,000, 2000, 3000, 4000 आणि कमाल 5,000 रुपये मिळू शकते. जर तुम्हाला या पेन्शन योजनेसाठी नोंदणी करायची असेल तर तुमच्याकडे बचत खाते, आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे.

जर एखादी व्यक्ती 18 वर्षांच्या वयात अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करू लागली, तर त्याला 60 वर्षांच्या वयानंतर प्रत्येक महिन्याला 5000 रुपये मासिक पेन्शन मिळू लागते. विशेष म्हणज यासाठी तुम्हाला फक्त दरमहा 210 रुपये जमा करावे लागतील.

जर एखादी व्यक्ती वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक करू लागली तर वयाच्या 60 वर्षांनंतर त्याला दरमहा 5,000 रुपये मासिक पेन्शनसाठी फक्त 210 रुपये जमा करावे लागतील. त्याचबरोबर 39 वर्षापेक्षा कमी वयाचे पती -पत्नी या योजनेत वेगवेगळे 420 रुपये जमा करून वयाच्या 60 वर्षांनंतर प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये पेन्शन मिळवू शकतात.

या योजनेमध्ये दरमहा 1000 रुपये मासिक पेन्शनसाठी दरमहा फक्त 42 रुपये जमा करावे लागतील. दुसरीकडे, 2000 रुपयांच्या पेन्शनसाठी 84 रुपये, 3000 रुपयांसाठी 126 रुपये आणि 4000 रुपये मासिक पेन्शनसाठी 168 रुपये दरमहा जमा करावे लागतील.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!