Tuesday, November 30, 2021

भंडारदरा-निळवंडेतून पाणी सोडले

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील काल मंगळवारी दुपारी 4 वाजेनंतर पाणलोटात पावसाचा जोर वाढल्याने भंडारदरा धरणात पाण्याची आवक वाढल्याने काल सायंकाळी 7 वाजता 2034 क्युसेकने तर रात्री 4396 क्युसेक पाणी सोडण्यात येत होते.

निळवंडेतून प्रवरा नदीपात्रात 4753 क्युसेकने तर तो विसर्ग रात्री 11 वा. 6339 क्युसेक पर्यंत पाणी सोडण्यात येत आहे. पाऊस वाढल्यास यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दोन्ही धरणें 100 टक्के भरलेली आहेत.

भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढले.निळवंडे धरणातून 4 हजार 753 क्युसेक विसर्ग सुरू आहे. पावसाची तीव्रता वाढल्यास विसर्गात वाढ केली जाईल अशी माहिती भंडारदरा धरणाचे शाखा अभियंता अभिजीत देशमुख यांनी दिली.

भंडारदरा व निळवंडे दोन्हीही धरणे भरलेली आहेत,त्यामुळे धरणात जमा होणारे सर्व पाणी सोडून देण्यात येते.पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे भंडारदरा धरणातून स्पील वे मधून 1218 क्यूसेक तर वीज केंद्रातून 816 असा एकूण 2034 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला .तर निळवंडे

धरणातून स्पील वे मधून 4103 क्युसेक तर वीज निर्मिती केंद्रातून 650 क्युसेक असा एकूण 4 753 क्युसेक विसर्ग प्रवरा पात्रात सायंकाळी सुरू होता.पावसाचा जोर वाढल्यास रात्रीतून त्यात वाढ होऊ शकेल.

चार दिवसांपासून पाणलोटात पाऊस थांबल्याने धरणातून पाणी सोडणे बंद करण्यात आले होते. पण काल दुपारपासून पुन्हा पावसास सुरूवात झाली. त्यात पावसाचा जोर वाढलां पाण्याची आवक वाढल्याने धरणातून पाणी सोडण्यात आले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!