Thursday, December 7, 2023

कृषी पंप वीज तोडणी विरोधात प्रहारचा प्रवरासंगमला रस्तारोको

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

अनधिकृत पद्धतीने शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची अनाधिकृत वीज पुरवठा खंडित केल्याच्या विरोधात आ.बचु कडू प्रणीत प्रहार जनशक्ति पक्षाचे वतीने प्रवरासंगम येथे रस्तारोको आंदोलन करण्यात आले.अनाधिकृतपणे विज कट करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे यांनी केली.

नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा वीज पुरवठा अनधिकृतपणे खंडित करण्याची मोहीम वीज वितरण कंपनीने हाती घेतल्याच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे यांच्या नेतृत्वाखाली प्रवरा संगम येथे नगर छत्रपती संभाजी नगर महामार्गावर आज शनिवार दि.११ मार्च रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले

यावेळी बोलताना श्री.पोटे म्हणाले की,शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शनला हात लावाल तर प्रहार होईल.
महावितरणच्या निषेधार्थ जिल्हाभर शेतकऱ्यांच्या विज समस्यांचा वनवा पेटवणार.शेतकऱ्यांची लाईट पुन्हा खंडित केली तर महावितरण जिल्हा कार्यालयावर तीव्र आंदोलन करू.अनधिकृत पद्धतीने शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज कट करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी केली.

नेवासा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता शरद चेचर यांचे कडून कृषि पंपाचा विज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन मिळाल्यावरच प्रहारचा रास्ता रोको मागे घेण्यात आला.वीज अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारा विरोधात प्रहार सोबत हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले होते.
पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाची चौक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

रास्तारोको दरम्यान आर्मीचे वरिष्ठ अधिकारी अहमदनगर वरून संभाजीनगर विमानतळाकडे जात असताना रस्त्यात अडकले असल्याचे कळताच प्रहारने जवानांना सलाम करत रस्ता केला मोकळा केला.

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!