Tuesday, November 30, 2021

नगर जिल्ह्यात पुन्हा कांद्याच्या भावात वाढ

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :काल मंगळवारी अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत 3970 गोणी कांद्याची आवक झाली. कांद्याला 2300 रुपये भाव मिळाला .यामुळे कुठे तरी शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.

कांदा नंबर 1 ला प्रति क्विंटल 1900 ते 2300 असा भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1350 ते 1850 असा भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 600 ते 1300 रुपये इतका भाव मिळाला. गोल्टी कांदा 1400 ते 1700 व जोड कांदा 100 ते 500 रुपये भाव मिळाला.

तर जिल्ह्यातील अकोले येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची 941 गोणी आवक झाली. एक नंबर कांद्यास 2125 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले. नं.1 रु 1851 ते 2125, नं.2 ला रु.1451 ते 1851, नं.3 ला रु.1151 ते 1451, गोल्टी रु. 1051 ते 1551, खाद रु.250 ते 651 प्रमाणे बाजार भाव मिळाले.

अकोले बाजार आवारात रविवार, मंगळवार, गुरुवार या तीन दिवशी लिलाव होत आहेत. शेतकरी वर्गाने आपला कांदा योग्य बाजारभाव मिळण्यासाठी लिलावाच्या दिवशी सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत व कांदा 50 किलो बारदान गोणित, वाळवून, निवड करून बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणावा.

बाजार आवारात प्रवेश करताना प्रवेशद्वारावरच प्रत्येकाने हाताला सॅनेटाईज करणे, नाकाला व तोंडाला मास्क लावणे, बाजार आवारात कुणीही थुंकू नये, सोशल डिस्टनसिंग या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन बाजार समितीचे सभापती परबतराव नाईकवाडी, उप सभापती भरत देशमाने, संचालक व सचिव अरुण आभाळे यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!