Saturday, November 27, 2021

कधीही जायकवाडी ओव्हरफ्लो होणार;झाला इतका साठा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मराठवाड्याचे जीवनदायी म्हणून ओळख असलेल्या जायकवाडी धरणात मराठवाडा तसेच मुक्त पाणलोटातील धुव्वाधार पाऊस आणि गोदावरीच्या काठावरील जोरदार पावसाने जायकवाडी च्या जलाशयात काल

सायंकाळी 6 वाजता तब्बल 72 हजार 407 क्युसेकने नवीन पाण्याची आवक होत होती. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने हे धरण 95 टक्के भरताच विसर्ग सोडण्यात येणार आहे.मध्यरात्री 89 टक्के पाणी साठा झाला होता. नाशिक, नगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातून या धरणात आणखी नवीन पाण्याची आवक होणार आहे.

तसेच पाऊसही सुरू आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पूर्ण क्षमतेने धरण न भरता काहीसे रिकामे ठेऊन या धरणातून पाणी सोडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.गोदवरीतून काल सायंकाळी 20 हजार 424 क्युसेकने विसर्ग सुरू होता. यंदाच्या हंगामात तिसर्‍यांदा ही नदी दुथडी होत आहे.

काल सकाळी 6 वाजता जायकवाडीत 85 टक्के पाणीसाठा होता. तर नवीन पाण्याची आवक 17481 क्युसेक ने सुरु होती. काल मराठवाड्यातील वैजापूर, गंगापूर तसेच जायकवाडी जलाशयाच्या मुक्त पाणलोटात मुसळधार पाऊस सुरु होता. त्यामुळे जायकवाडी जलाशयात काल या जलाशयात

सायंकाळी 6 वाजता 64 हजार 653 क्युसेक ने पाण्याची आवक होत होती. त्यात रात्रीतून आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या धरणातील पाणीसाठा 87 टक्क्यांवर पोहचला होता. उपयुक्तसाठा 67.05 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पाण्याची आवक वाढल्याने हा साठा सकाळी 90 टक्क्यांच्या पुढे जावु शकतो.

सलग 24 तास ही आवक अशीच टिकून राहिली तर या जलाशयात 5 टीएमसी पर्यंत पाणीसाठा वाढू शकतो. किमान अजून 10 टीएमसी पाण्याची नवीन आवक झाली तर हा जलाशयात दोन दिवसात तुडूंब होऊन विसर्ग त्यातून सुरु होऊ शकतो.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!