Friday, December 3, 2021

नगर ब्रेकींग:विहिरीत आढळला युवकाचा मृतदेह

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील  कोल्हेवाडी येथील 35 वर्षीय युवकाचा मृतदेह सोमवारी रात्री तालुक्यातील कासारवाडी परिसरातील एका विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. प्रदीप पोपट कोल्हे असे या मयत युवकाचे नाव आहे.

प्रदीप कोल्हे हा दोन दिवसांपूर्वी दवाखान्याचे कारण सांगून घराबाहेर पडला होता. तो घरी आला नाही म्हणून त्याचे नातेवाईक त्याचा शोध घेत होते. तो मिळून आला नाही म्हणून शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची खबर देण्यात आली होती.

सोमवारी रात्री संगमनेर शहरालगतच्या कासारवाडी शिवारातील एका विहिरीत त्यांचा मृतदेह तरंगताना आढळला. बाबासाहेब पांडे (रा. घुलेवाडी) यांनी शहर पोलिसांना याबाबतची खबर दिली.घटनेची माहिती मिळताच पोलीस कासारवाडी येथे गेले. ग्रामस्थांच्या मदतीने त्यांनी या युवकाचा

मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. पंचनामा करून त्याचा मृतदेह कॉटेज रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर काल दुपारी कोल्हेवाडी येथे प्रदीप कोल्हे याच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान शहर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास हेड कॉन्स्टेबल बन्सी टोपले करत आहेत.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!