Wednesday, December 8, 2021

पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र महाराष्ट्राला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. आता येणाऱ्या पुढील 48 तास महत्त्वाचे आहेत. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, पावसाचा मराठवाड्याला

चांगला तडाखा बसला आहे. 10 जणांचा मृत्यू झाला असून 200 जनावरं दगावली आहेत. बीडमध्ये अनेक गावांचा संपर्क तुटला तर उस्मानाबादमध्ये पुरात अडकलेल्यांची हेलिकॉप्टरच्या मदतीने सुटका करण्यात आली आहे.महाराष्ट्रातील पूरस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला आहे.

त्यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला काही सूचना केल्या आहेत.अरबी समुद्रात नवं वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेपुढील 48 तास राज्यासाठी महत्त्वाचे आहेत. गुलाब चक्रीवादळाचं तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘गुलाब’ चक्रीवादळ निवळले असून त्याचं रुपांतर अती तीव्र अशा कमी दाबाच्या पट्ट्यात झाले आहे. त्यामुळे येत्या 24 तासात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार

पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. उद्या हे कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात प्रवेश करणार आहे.. अरबी समुद्रात त्याची तीव्रता पुन्हा वाढून नवे चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज आहे. अरबी समुद्रात नवे चक्रीवादळ तयार झाल्यास त्याचे नाव ‘शाहीन’ असणार आहे. या वादळामुळे राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!