Friday, December 3, 2021

शरद पवार शेतकऱ्यांचा खजिना लुटण्यात माहीर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:उसाच्या एफआरपीच्या मुद्द्यावरून राज्य सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. यामागे महाविकास आघाडीचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा हात आहे. त्यांचा हा डाव आम्ही हाणून पाडू. शरद पवार हे जाणता राजा नाहीत.

ते उद्योजकांचे नेते आहेत. त्यांच्या मुखात राम असतो तर बगलेत सुरी असते, अशा शब्दांत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.पंचायत राज समितीच्या दौऱ्याच्या निमित्ताने सदाभाऊ खोत दोन दिवसांपासून जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

त्यांनी मंगळवारी (२८ सप्टेंबर) रात्री भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. केंद्र सरकारचे 3 नवीन कृषी कायदे, उसाची एफआरपी, आरोग्य विभागाचा कारभार अशा विविध विषयांवर त्यांनी मते मांडत राज्य सरकारवर टीकास्त्र डागलं.सदाभाऊ खोत म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या विधानसभा आणि विधान

परिषदेत 2005 मध्ये करार शेतीचे एक विधेयक आले होते. हे विधेयक म्हणजेच आज केंद्राने पारित केलेले 3 नवीन कृषी कायदे आहेत. गेली अनेक वर्ष या तिन्ही कृषी कायद्यांचा खरा फायदा कुणी घेतला असेल, तर तो शरद पवारांच्या बारामती ऍग्रो कंपनीनं घेतला आहे.

स्वत: कायद्यांचा लाभ घ्यायचा. मात्र, आता फायदा घेण्याची शेतकऱ्यांची वेळ आल्यावर माझ्या कुटुंबाशिवाय कुणालाही लाभ मिळू नये, अशी दुटप्पी भूमिका पवार घेत आहेत, असा आराेप सदाभाऊ खाेत यांनी केला.’कृषी कायद्यांच्या विराेधात भारत बंद पुकारण्यात आला. परंतु, या बंदमध्ये शेतकरी कुठेही दिसला नाही.

जनतेनं या बंदकडे पाठ फिरवली. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी तीन कृषी कायदे तयार करून 70 वर्षांच्या गुलामगिरीतून शेतकऱ्यांना मुक्त करण्याचा आशावाद निर्माण केला आहे’, असं खाेत म्हणाले.शरद पवारांनी कधीही शेतकऱ्यांची बाजू घेतली नाही. म्हणून मी त्यांना कधीही जाणता राजा म्हणत नाही.

ते त्यांच्या आत्मचरित्रात म्हटल्याप्रमाणे वागत नाहीत. शेतकऱ्याचा खजिना लुटण्यात ते माहीर आहेत. म्हणूनच त्यांनी राज्य सरकारच्या वतीने उसाच्या एफआरपीचे तीन तुकडे करण्यास केंद्राला सांगितलं’, असा दावा खोत यांनी यावेळी केला

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!