Wednesday, December 8, 2021

नगर जिल्ह्यातील संतापजनक प्रकार:मृत्यूनंतरही रुग्णाला कोविडचे उपचार ;या दवाखान्याचा प्रताप

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज – नगर शहरातील सावेडी भागात असलेल्या डॉ.गोपाळ बहुरुपी आणि डॉ सुधीर बोरकर संचलित न्युक्लिअस हॉस्पिटल आणि अहमदनगर कोविड केअर सेंटर येथे रुग्णाला मृत्यू नंतरही कोविडचे उपचार दिले गेल्याचा खळबळजनक प्रकार घडला असून, डॉक्टरांनी केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे साधा आजार असलेल्या रुग्णाला कोविडची ट्रिटमेंट दिल्यागेल्यामुळे मृत्यूला सामोरे जावे लागले आहे.

बबनराव नारायण खोकराळे, वय – 79, रा.हनुमाननगर, सावेडी, नगर असे मृत्यू पावलेल्या रुग्णाचे नाव असून, सदर रुग्णाच्या मुलाने या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात या संदर्भात याचिका दाखल केल्यानंतर औरंगाबाद उच्च न्यायालयाने येथील शासकीय यंत्रणेला या संदर्भात चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार जिल्हा शासकीय रुग्णालयाने चौकशी समिती नेमुन याबाबतचा अहवाल कोर्टाला सादर केला आहे. या अहवालात संदर्भिंत समितीने न्यूक्लिअस हॉस्पिटल आणि अहमदनगर कोविड केअर सेंटर येथील डॉ.गोपाळ बहुरुपी आणि डॉ.सुधीर बोरकर यांचा गलथानपणा चव्हाट्यावर आणला आहे. स्वत: सिव्हील सर्जन डॉ.सुनिल पोखरणा यांच्या अधिपत्याखाली असलेल्या

सहा जणांच्या डॉक्टरांच्या समितीने न्यायालयाला सादर केलेल्या अहवालामध्ये उपरोक्त दोन्ही रुग्णालयांच्या दुर्लक्षापणाबाबत गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत. रुग्णाचा कुठलाही प्रकारचा आरटीपीसीआर रिपोर्ट नसताना रुग्णाला कोविडची ट्रिस्टमेंट दिली गेली. नातेवाईक, अथवा पेशंट यांची कुठल्याही प्रकारची

संमती न घेता रुग्णास एका रुग्णालयातून दुसर्या रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णाची सद्य परिस्थिती पेशंटला अथवा नातेवाईकांना डॉक्टर अथवा संबंधित व्यवस्थापनाने नातेवाईकांना कळविलेले नाही. वास्तविक पाहता रुग्णाला रेमडिसिव्हर देतांना काही शासकीय प्रोट्रोकॉल यांचे पालन करणे आवश्यक असते.

एकाच दिवशीच्या आसपास रुग्णाला 5 रेमडिसिव्हर दिल्यामुळे रुग्णाची अवस्था गंभीर झाली. एकाच रुग्णालयात दोन वेगवेगळ्या वेळांना रुग्णाला मृत घोषित करण्यात आले. दोन्ही डेथ सर्टिफिकेटस् वेगवेगळ्या वेळांचे असूनही त्याबाबतही संबंधित समितीने न्यायालयाच्या निर्दशानास ही बाब आणून दिली. याशिवाय पेशंटचा मृत्यू झाल्यानंतरही नातेवाईकांना

याबाबतची माहिती दिली गेलेली नाही. शिवाय मृत्यू बाबतचे कुठल्याही प्रकारचे रेकॉर्ड संबंधित हॉस्पिटलने जतन करुन ठेवलेले नाही. मृत देहाची विल्हेवाट लावण्याबाबत तफावत आढळून आल्याचे संबंधित समितीने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले आहे. गंभीरबाब म्हणजे कोविडची आरटीपीसीआर टेस्ट न करताही संबंधित रुग्णाला कोविडची ट्रीटमेंट देऊ केली.

आणि रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतरही रुग्णाला कोविडची ट्रीटमेंट दिली गेल्याचे न्यायालयाच्या या समितीने निदर्शनास आणून दिलेले आहे. याबाबत रुग्णाचा मुलगा अशोक बबनराव खोकराळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अ‍ॅड.अजित काळे यांच्या मार्फत याचिका दाखल केली असून, अहमदनगर कोविड सेंटर आणि न्युक्लिअस हॉस्पिटल

या शहरातील दोन्ही रुग्णालयांचे परवाने रद्द करुन संबंधित दोषी डॉक्टरांवर सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करुन न्याय द्यावा, अशी विनंती केली आहे. याबाबत यापुर्वीच एमआयडीसी पोलिस ठाण्यात या दोन्ही हॉस्पिटलला मदत करणार्या कृष्णा लॅबवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा तपासही प्रलंबित आहे.तरी या सर्व कटात सहभागी असणार्या सर्व दोषींवर

योग्य ती कायदेशीर कारवाई करुन न्याय द्यावा, अशी विनंती देखील खोकराळे यांनी मा.उच्च न्यायालयाला केलेली आहे.सिव्हील सर्जन यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीने संबंधित दोन्ही रुग्णालयावर आणि त्यांच्या कारभारावर ताशोरे ओढल्याने त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, या घटनेमध्ये शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे डॉक्टरांच्या या समितीने या गंभीरबाबी मा.उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे बोगस प्रॉक्टीस करणार्या डॉक्टरांचे धाबे दणाणले आहे.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!